Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding | संगीत, मेहंदी अन् शाही विवाह, ‘या’ दिवशी रंगणार कतरिना-विकीच्या लग्नाचे सोहळे!

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाबाबत अजूनही अनेक बातम्या येत आहेत. रोज काहीना काही नव्या अपडेट येत असतात. कधी लग्नाच्या बातम्यांचे खंडन केले जाते, तर कधी त्यांचे लग्न ठरल्याचे सांगितले जाते.

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding | संगीत, मेहंदी अन् शाही विवाह, 'या' दिवशी रंगणार कतरिना-विकीच्या लग्नाचे सोहळे!
Vicky-Katrina

मुंबई : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाबाबत अजूनही अनेक बातम्या येत आहेत. रोज काहीना काही नव्या अपडेट येत असतात. कधी लग्नाच्या बातम्यांचे खंडन केले जाते, तर कधी त्यांचे लग्न ठरल्याचे सांगितले जाते. बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेली बातमी म्हणजे या दोन स्टार्सच्या लग्नाची बातमी! त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत मोठा खुलासा झाला आहे. जवळच्या मित्राच्या माध्यमातून त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

पिंकविलामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या हॉट कपलच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. 9 डिसेंबरला हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांचे लग्न राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील फोर्ट बरवारा या रिसॉर्टमध्ये होणार आहे. पिंकविलाने कतरिना कैफच्या जवळच्या स्त्रोताकडून या वृत्ताला पुष्टी दिल्याचा दावा केला आहे. त्या सूत्राने सांगितले की, दोघेही 9 डिसेंबरला हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत. या लग्नसोहळ्याला या दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. राजस्थानमध्ये अनुक्रमे 7 आणि 8 डिसेंबर रोजी संगीत आणि मेहंदीचे सोहळे होणार आहेत.

नातेवाईकांकडून लग्नाच्या वृत्तास नकार!

विकी आणि कतरिना त्यांच्या लग्नाशी संबंधित कोणतीही बातमी सार्वजनिक होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लग्नाबद्दलची सर्व माहिती गोपनीय राहावी याची काळजी घेतली जात आहे. या दोघांचे अनेक नातेवाईकही माध्यमांशी बोलणे टाळत आहेत. अलीकडेच, विकीच्या चुलत बहिणीनेही लग्नाची बातमी अफवा असल्याचे म्हटले होते. ती म्हणाली की, विकी आणि कतरिना लग्न करत नाहीयत. असे काही घडले असते, तर सर्वांना कळवले असते. अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण सूत्रांकडून या लग्नाला दुजोरा मिळत आहे.

अनेक बडे सेलिब्रिटी सामील होणार असल्याची चर्चा!

या लग्नाला येणार्‍या पाहुण्यांच्या नावाची चर्चाही रंगली आहे. या लग्नात जवळपास 200 पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या लग्नाच्या संगीत सेरेमनी आणि मेहंदी सोहळ्याशी संबंधित अनेक बातम्या चर्चेत येत आहेत. या उत्सवांचे विशेष नियोजन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एक यादी समोर आली होती, ज्यामध्ये या लग्नात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींची नावे लिहिली होती. त्या नावांमध्ये सलमान खानचे नाव मात्र दिसले नव्हते.

हेही वाचा :

दिशा पटानीच्या नाकावर शस्त्रक्रिया? अभिनेत्रीला पाहून चाहते म्हणाले ‘हिनेही चेहऱ्याची वाट लावली..’

Antim Box Office Collection Day 1:सलमान खान-आयुष शर्माचा बॉक्स ऑफिसवर जलवा, पहिल्याच दिवशी ‘अंतिम’ची तुफान कमाई!


Published On - 1:07 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI