दिशा पटानीच्या नाकावर शस्त्रक्रिया? अभिनेत्रीला पाहून चाहते म्हणाले ‘हिनेही चेहऱ्याची वाट लावली..’

बॉलिवूड अभिनेत्री आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी दिशा पटानी (Disha Patani) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दिशा चित्रपटांमध्ये सक्रिय असून, सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

दिशा पटानीच्या नाकावर शस्त्रक्रिया? अभिनेत्रीला पाहून चाहते म्हणाले ‘हिनेही चेहऱ्याची वाट लावली..’
Disha Patani

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी दिशा पटानी (Disha Patani) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दिशा चित्रपटांमध्ये सक्रिय असून, सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. अलीकडेच शुक्रवारी दिशा सलमान खानच्या ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी पोहोचली होती. यावेळी तिने पिवळा क्रॉप टॉप आणि डेनिम्स परिधान केले होते.

दिशाने शस्त्रक्रिया केली?

या लूकमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत होती. मात्र, यावेळी तिचे फोटो एका वेगळ्याच कारणामुळे जबरदस्त व्हायरल होऊ लागले. दिशाचे फोटो पाहून अनेक यूजर्सच्या मनात असा प्रश्न येऊ लागला की, कदाचित तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी असा अंदाज लावलाय की, आणखी सुंदर दिसावे यासाठी दिशाने नाक आणि ओठांची सर्जरी करून घेतली आहे. यासोबतच युजर्सनीही या व्हिडीओ आणि फोटोंवर कमेंट करायला सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एका यूजरने लिहिले की, ‘दिशा खूप वेगळी दिसतेय’. एकाने लिहिले की, ‘दुसरी अभिनेत्री जिने स्वतःचा चेहरा खराब केला.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘हिने नाकाचे काहीतरी केले आहे.’ त्याच वेळी, अनेक वापरकर्त्यांनी म्हटलेय की, ‘शस्त्रक्रिया नक्कीच झाली आहे, त्यामुळेच तिचा चेहरा असा दिसतो आहे.’ दिशाच्या चेहऱ्यावरील सर्जरीमुळे आणि तिच्या या लूकमुळे अनेकजण नाराज असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अभिनेत्रीने या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दिशा कामात व्यस्त!

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या दिशा तिच्या आगामी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री बोल्ड अवतारात दिसणार आहे. या चित्रपटातील बहुतेक स्टंट्स दिशा स्वतः करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी ती अतिशय कठीण प्रशिक्षणही घेत आहे.

दिशा पटानी या चित्रपटात बोल्ड आणि बेधडक व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटाच्या कथेत अनपेक्षित ट्विस्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मोहित सुरीच्या या चित्रपटात दिशा व्यतिरिक्त जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया देखील दिसणार आहेत.

दिशाच हा आगामी चित्रपट ‘एक व्हिलन’चा सिक्वेल असून, हा अॅक्शन थ्रिलर पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहे. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा चित्रपट 8 जुलै 2022 रोजी रिलीज होणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती टी-सीरीज आणि बालाजी टेलिफिल्म्स यांनी केली आहे. दिशा शेवट सलमान खान सोबत ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा :

Antim Box Office Collection Day 1:सलमान खान-आयुष शर्माचा बॉक्स ऑफिसवर जलवा, पहिल्याच दिवशी ‘अंतिम’ची तुफान कमाई!

Happy Birthday Tina Datta | ‘उतरन’ मालिकेतून टीना दत्ताला मिळाली प्रसिद्धी, बोल्ड फोटोशूटमुळेही राहिली चर्चेत!


Published On - 12:43 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI