AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अस्वच्छ शौचालयांचे फोटो पाठवा, 1000 रुपये जिंका, NHAI चा उपक्रम

प्रत्येक टोल प्लाझावर शौचालयाची सुविधा आहे. अनेक वेळा अशी शौचालये खूप घाणेरडी असतात, जी वापरण्यायोग्य देखील नसतात. जर तुम्हाला देखील असे शौचालय मिळाले तर तुम्ही 1000 रुपये जिंकू शकता.

अस्वच्छ शौचालयांचे फोटो पाठवा, 1000 रुपये जिंका, NHAI चा उपक्रम
अस्वच्छ शौचालयांचे फोटो पाठवाImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 13, 2026 | 1:44 PM
Share

तुम्हाला अस्वच्छ शौचालय मिळाले तर तुम्ही 1000 रुपये जिंकू शकता. प्रत्येक टोल प्लाझावर शौचालयाची सुविधा आहे. अनेक वेळा अशी शौचालये खूप घाणेरडी असतात, जी वापरण्यायोग्य देखील नसतात. हेच हेरून तुम्ही 1,000 रुपये जिंकू शकतात. फ्री रिचार्ज मिळवण्यासाठी तुमच्या फोनमध्ये Rajmargyatra अ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन असणे आवश्यक आहे. अस्वच्छ शौचालयाची नोंद करणाऱ्या प्रत्येक वाहन क्रमांकाला (VRN) 1,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

तुम्ही काढलेला हा फोटो राजमार्गयात्रा अ‍ॅपवरूनच पाठवायचा आहे आणि त्यात लोकेशनची माहिती (जिओ टॅग) असणे आवश्यक आहे. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. महामार्गावर स्वच्छता राखण्यास मदत केल्यास भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) त्यासाठी बक्षीस देईल. टोल नाक्यावरील घाणेरड्या शौचालयांची माहिती देणाऱ्या प्रवाशांना फास्टॅग खात्यात 1,000 रुपयांचे रिचार्ज मिळणार आहे. या मोहिमेचे नाव आहे “क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज”. ही योजना 30 जून 2026 पर्यंत लागू आहे.

फास्टॅग मध्ये 1,000 चा मोफत रिचार्ज कसा मिळेल?

  • फ्री रिचार्ज मिळवण्यासाठी तुमच्या फोनमध्ये Rajmargyatra अ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन असणे आवश्यक आहे.
  • वाटेत दिसणार् या घाणेरड्या शौचालयाचा स्वच्छ फोटो घ्या आणि अ‍ॅपवर अपलोड करा.
  • आपले नाव, जागेचे नाव, वाहन क्रमांक (VRN) आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
  • अस्वच्छ शौचालयाची नोंद करणाऱ्या प्रत्येक वाहन क्रमांकाला (VRN) 1,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
  • हे पैसे रोखीने काढता येणार नाहीत, ते केवळ तुमच्या फास्टॅगमध्ये येतील.
  • ही योजना केवळ NHAI द्वारे चालवल्या जाणार् या शौचालयांसाठी आहे. पेट्रोल पंप, ढाबे किंवा रेस्टॉरंटमधील शौचालयांचा या योजनेत समावेश नाही.

अ‍ॅप आपले रिपोर्ट कसे तपासेल?

  • शौचालयासाठी दिवसातून एकदाच बक्षीस दिले जाईल. एकाच दिवशी एकाच टॉयलेटचा फोटो अनेक लोकांनी पाठवला तर बक्षीस फक्त फोटो पाठवणाऱ्यालाच दिले जाईल.
  • हा फोटो राजमार्गयात्रा अ‍ॅपवरूनच पाठवायचा आहे आणि त्यात लोकेशनची माहिती (जिओ टॅग) असणे आवश्यक आहे.
  • फोटोवर वेळ देखील लिहिली पाहिजे जेणेकरून कोणता अहवाल प्रथम आला आहे हे कळू शकेल.
  • मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जर हा फोटो बनावट असेल किंवा आधीच पाठवला गेला असेल तर तो नाकारला जाईल. सर्व फोटो AI आणि अधिकाऱ्यांद्वारे तपासले जातील.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा