Antim Box Office Collection Day 1:सलमान खान-आयुष शर्माचा बॉक्स ऑफिसवर जलवा, पहिल्याच दिवशी ‘अंतिम’ची तुफान कमाई!

अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Ayush Sharma) यांचा 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antil : The Final Truth) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते 2' हा चित्रपट ‘अंतिम’ रिलीज होण्याच्या एक दिवस आधी रिलीज झाला होता.

Antim Box Office Collection Day 1:सलमान खान-आयुष शर्माचा बॉक्स ऑफिसवर जलवा, पहिल्याच दिवशी ‘अंतिम’ची तुफान कमाई!
Antim

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Ayush Sharma) यांचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ (Antil : The Final Truth) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट ‘अंतिम’ रिलीज होण्याच्या एक दिवस आधी रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करता आली नाही. आता सलमानचा ‘अंतिम’ प्रदर्शित झाला आहे. सलमान आणि आयुषच्या कामाचे खूप कौतुक केले जात आहे आणि या चित्रपटांनी पहिल्याच दिवशी चांगला गल्लाही जमवला आहे.

‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात आयुष शर्मा मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये सलमान खानला कदाचित जास्त फुटेज दिले गेले असेल, पण या चित्रपटात सलमान सेकंड लीडची भूमिका साकारत आहे. बरं, चित्रपटात सलमानचं केवळ असणं पुरेसं आहे. त्यामुळे हा चित्रपट सलमान खानच्या चित्रपटाप्रमाणेच सादर केला जात आहे. BoxOfficeIndia.com नुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे 4.50 कोटींची कमाई केली आहे, जी ‘सत्यमेव जयते 2’ च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा जास्त आहे. या दोन चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. शनिवार आणि रविवारच्या कलेक्शनमध्ये कोणाचा हात वरचा असेल, याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.

जॉन अब्राहम आणि सलमान खान बॉक्स ऑफिसवर आमनेसामने!

सलमान खान आणि आयुष शर्मा स्टारर ‘अंतिम’च्या एक दिवस आधी रिलीज झालेल्या जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते 2’ ने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 3.60 कोटींचा व्यवसाय केला. दिवाळीला रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा या दोन्ही चित्रपटांची कमाई खूपच कमी आहे. या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करावी लागणार आहे. सलमान खानच्या ‘अंतिम’ला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला आहे

‘अंतिम’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली झाली असून, महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये आयुष शर्मा लीड रोलमध्ये आहे, तर सलमान खान सेकंड लीडमध्ये आहे. या चित्रपटात शेतकऱ्यांच्या समस्याही केंद्रस्थानी ठेवण्यात आल्या होत्या. या दोन्ही कलाकारांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे, या चित्रपटात सलमान खान आणि आयुष शर्मासोबत जीसू सेनगुप्ता, प्रज्ञा जैसल आणि महिमा मकवाना हे कलाकार झळकले आहेत. हा चित्रपट 26 नोव्हेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा :

Aai Kuthe Kay Karte | जुनं प्रेम की फक्त मैत्री? अरुंधती-आशुतोषच्या भेटीगाठींना देशमुख कुटुंबाचा विरोध!

काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी रॉयच्या कातीलाना अदा, फोटो पाहून चाहत्यांच्या नजराही खिळल्या!


Published On - 12:13 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI