Aai Kuthe Kay Karte | जुनं प्रेम की फक्त मैत्री? अरुंधती-आशुतोषच्या भेटीगाठींना देशमुख कुटुंबाचा विरोध!

अरुंधतीच्या आयुष्यात आलेल्या या खास जुन्या मित्राने आता तिला आयुष्यात पुढे जाण्याची नवी संधी दिली आहे. या संधीला देशमुख कुटुंबातील काही लोक उपकार मानत असून, यावरून सतत अरुंधतीला बोलणी खावी लागत आहे.

Aai Kuthe Kay Karte | जुनं प्रेम की फक्त मैत्री? अरुंधती-आशुतोषच्या भेटीगाठींना देशमुख कुटुंबाचा विरोध!
Aai Kuthe kay karte

मुंबई : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या एका नव्या वळणावर जात आहे. ही मालिका प्रचंड गाजते आहे. मालिकेचं भावनिक कथानक आणि एका आईची गगनभरारी असा आशय घेऊन पुढे चाललेली ही मालिका प्रेक्षकांना देखील प्रचंड भावते आहे. मात्र, आता मालिकेत एक नवं वळण आलं आहे. घटस्फोट झाल्यानंतर आता आई अर्थात ‘अरुंधती’च्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. या व्यक्तीमुळे आता अरुंधतीचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे.

अरुंधतीच्या आयुष्यात आलेल्या या खास जुन्या मित्राने आता तिला आयुष्यात पुढे जाण्याची नवी संधी दिली आहे. या संधीला देशमुख कुटुंबातील काही लोक उपकार मानत असून, यावरून सतत अरुंधतीला बोलणी खावी लागत आहे. आता आशुतोषच्या अरुंधतीच्या आयुष्यात येण्याने आता तिचं संपूर्ण कुटुंबं तिच्या विरोधात जाताना पाहायला मिळणार आहे.

अनिरुद्धची टोमणेबाजी

नुकतीच आशुतोषने अरुंधतीला त्याच्या अल्बममध्ये गाण्याची ऑफर दिली आहे. शिवाय अरुंधती ज्या संस्थेत काम करते ही संस्था आशुतोषची आई यांची आहे. त्यामुळे योगायोगाने अरुंधती आणि आशुतोषची सतत भेट होते. यावरून अनिरुद्ध तिला सतत काहीना काही टोमणे देत आहे. इतकेच नव्हे तर तो घरातील इतरांना देखील अरुंधती विरोधात भडकवत आहे. मात्र, या सगळ्यात अप्पा आणि यश मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

अभिषेकदेखील जाणार विरोधात!

अनिरुद्धची आई अरुंधतीला म्हणते की, आशुतोषचं सतत असं येणं बरं दिसत नाही. यावर अरुंधती आईंना उलट उत्तर देते की, गेली 13 वर्ष संजना अनिरुद्धची मैत्रीण म्हणून या घरात येत होती, तेव्हा कोणी असा प्रश्न केला नाही. यानंतर घरातील माहोल बदलतो. या वादात उडी घेत अभिषेक देखील अरुंधतीला म्हणतो की हे चुकीचं आहे, कारण आईचा मित्र असूच शकत नाही. आशुतोष हे सगळं केवळ आईला त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबून ठेवण्यासाठी करत असल्याचा आरोप देखील तो करतो. अर्थात आता स्वतः मुलगा देखील आईच्या विरोधात जाताना दिसणार आहे. त्यामुळे आता घरात आई विरुद्ध मुलगा असा नवा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

Tara Sutaria | ‘बोल्ड अँड ब्युटीफुल’, सोशल मीडियावर दिसला तारा सुतारियाचा घायाळ करणारा अंदाज!

Happy Birthday Tina Datta | ‘उतरन’ मालिकेतून टीना दत्ताला मिळाली प्रसिद्धी, बोल्ड फोटोशूटमुळेही राहिली चर्चेत!


Published On - 11:19 am, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI