AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Most Expensive Flat : कोण आहे ती महिला जिने मुंबईत खरेदी केले सर्वात महागडे घर; किंमत वाचून बसेल धक्का

India Most Expensive Residential Deal : या उद्योजिकेने मुंबईत सर्वात महागडा फ्लॅट खरेदी केला आहे. त्यासाठी 639 कोटी रुपयांची किंमत मोजली आहे. हा भारतातील महागडा सौदा ठरला आहे. कोण आहे ती उद्योजिका? कोणती आहे तिची कंपनी?

Most Expensive Flat : कोण आहे ती महिला जिने मुंबईत खरेदी केले सर्वात महागडे घर; किंमत वाचून बसेल धक्का
महागड्या घराचा सौदाImage Credit source: गुगल
| Updated on: May 30, 2025 | 4:45 PM
Share

Leena Gandhi-Tiwari : मुंबईतील आलिशान घरांच्या मार्केटमध्ये अजून एक विक्रम रचल्या गेला आहे. वरळीतील समुद्र किनाऱ्यावरील डुप्लेक्स आपर्टमेंट 639 कोटीत खरेदी करण्यात आले आहे. वरळी बिंदू माधव ठाकरे चौकातील 40 मजली नमन-झाना या इमारतील 32 आणि 35 मजल्यांवर हे दोन फ्लॅट्स 639 कोटी रुपयांना उद्योजिका लीना गांधी-तिवारी यांनी खरेदी केले आहे. नमन-झाना ही 40 मजली इमारत आहे. दिग्गज फार्मा कंपनी USV India च्या अध्यक्ष लीना तिवारी यांनी हे दोन्ही फ्लॅट खरेदी केले आहेत.

वरळीतील महागडा सौदा

या डुप्लेक्ससाठी लीना तिवारी यांनी एकूण 703 कोटी रुपये मोजले. या सदनिकेच्या खरेदीसाठी 63.9 कोटी रुपये मोजले. वरळी समुद्र किनाऱ्या लगतच्या Naman Xana मधील दोन फ्लॅटची विक्री झाली आहे. हे दोन फ्लॅट्स 22,572 चौरस फूट आकाराचचे आहे. फ्लॅट्ससाठी प्रति चौरस फूट दर 2.83 लाख रुपये असून या 22,572 चौरस फूट च्या फ्लॅट साठी आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम मोजली गेली आहे. 639 कोटी रुपये फ्लॅटसाठी तर 63.9 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटीसाठी सरकार दरबारी जमा करण्यात आले आहेत.

कोण आहेत लीना तिवारी?

दिग्गज फार्मा कंपनी USV India च्या लीना गांधी -तिवारी या अध्यक्ष आहेत. त्यांची गणना ही देशातील श्रीमंत महिलांमध्ये करण्यात येते. त्यांचे आजोबा विठ्ठल बालकृष्ण गांधी यांनी 1961 मध्ये ही कंपनी स्थापन केली होती. USV India ही बायो-टेक्नॉलॉजी कंपनी आहे. ती औषधी निर्माण करते. फोर्ब्सच्या अहवालानुसार, 29 मे, 2025 पर्यंत लीना यांची एकूण संपत्ती 3.9 अब्ज डॉलर इतकी होती. सध्या त्या जगातील 964 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 2023 मध्ये फोर्ब्स इंडियात त्या 45 व्या क्रमकांवरील श्रीमंत भारतीय महिला होत्या.

त्यांची संपत्ती बायोकॉन कंपनीच्या किरण मजूमदार-शॉ आणि नायका कंपनीच्या फाल्गुनी नायर यांच्यापेक्षा अधिक आहे. वर्ष 2023 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 3.7 अब्ज डॉलर इतकी होती. त्यांचे पती युएसव्हीचे कामकाज पाहतात. ही कंपनी जवळपास 511 दशलक्ष डॉलरचे उत्पन्न मिळवते.

भारतातील टॉप 5 मधील कंपनी

आज ही कंपनी मधुमेह आणि हृदयविकारावरील औषधं तयार करणारी भारतातील पाच कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी बायोसिमिलर औषधे, इंजेक्शनेबल आणि सक्रिय औषधी घटक तयार करते. लीना यांचे पती प्रशांत तिवारी यांन कार्नेलमधून मॅकनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. ते IIT पदवीधर आहेत. 2019 मध्ये लीना यांनी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून 34 कोटी रुपये दान केले होते. हुरूनच्या दानशूर महिलांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर होत्या.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.