Who is Yash Patil: वय फक्त 23 वर्ष अन् 42 हजार कोटींची AI कंपनी, कोण आहेत यश पाटील? अमेरिकेत वाजवला डंका

भारतीय वंशाचे अवघ्या 23 वर्षाचे उद्योजक यश पाटील सध्या एआय विश्वात चर्चेत आहेत. वयाच्या अवघ्या 23 वा वर्षी त्यांनी स्वतःची AI कंपनी उभारली. आता ती तब्बल 40 हजार कोटी रुपयांना विकली जाणार आहे. कोण आहेत यश पाटील? वाचा....

Who is Yash Patil: वय फक्त 23 वर्ष अन् 42 हजार कोटींची AI कंपनी, कोण आहेत यश पाटील? अमेरिकेत वाजवला डंका
| Updated on: Nov 20, 2026 | 5:59 PM

Yash Patil Palo Alto Networks Acquisition :  भारतीय वंशाचे अवघ्या 23 वर्षाचे उद्योजक यश पाटील सध्या एआय विश्वात चर्चेत आहेत. वयाच्या अवघ्या 23 वा वर्षी त्यांनी स्वतःची AI कंपनी उभारली. आता ती तब्बल 40 हजार कोटी रुपयांना विकली जाणार आहे. जगातील सर्वात मोठ्या सायबर सुरक्षांपैकी एक पालो अल्टो नेटवर्कने ही कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा व्यवहार 4.5 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 40 हजार कोटी रुपयांचा आहे.

वय वर्षे फक्त 23, AI कंपनी विकून कमावले 40 हजार कोटी! 

Loading...

स्टॅनफोर्ड विद्यापीठातून संगणकशास्त्रात पदवी घेतलेल्या यश पाटील  यांनी मे 2025 मध्ये रिदम आणि लिंडेन यांच्यासोबत ‘अप्लाइड कंप्यूट’ची स्थापना केली. यश पटेल यांच्या लक्षात आले की मोठ्या कंपन्या आता बाह्य एआय सेवांवर अवलंबून राहू शकत नाहीत. आपला डेटा सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी त्यांना स्वतःचे कस्टम एआय मॉडेल्स तयार करून चालवण्याची गरज होती. ‘अप्लाइड कंप्यूट’ कंपन्यांना त्यांच्या स्वतःच्या डेटाचा वापर करून कस्टम एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्याची सुविधा देत होती.

ही कंपनी केवळ 18 महिन्यांत शून्यापासून 100 दशलक्ष डॉलर्सच्या वार्षिक महसुलापर्यंत (ARR) पोहोचली. सुरू झाल्याच्या अवघ्या 12 आठवड्यांतच, कंपनीचा इन्फरन्स-सर्व्हिंग व्यवसाय दररोज १ ट्रिलियनवर ट्रेंड करत होता.  यश पाटील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर ओपनएआयमध्ये (OpenAI) सामील झाले. जिथे त्यांनी पोस्ट-ट्रेनिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर काम केले. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये, त्यांनी पूर्ण-वेळ तांत्रिक भूमिकेत काम करण्यास सुरुवात केली. ते मे 2025 पर्यंत ओपनएआयमध्ये कार्यरत होते.

सतेज पाटील यांनीही केलं कौतुक! 

यश पाटील यांच्या या यशाचे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही कौतुक केले आहे. यश पाटील यांचे मनापासून अभिनंदन! वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्यांनी ‘अप्लाइड कम्प्युट’ (Applied Compute) ही कंपनी उभारली आणि आता ती ‘पालो अल्टो नेटवर्क्स’ (Palo Alto Networks) ला 4.5 अब्ज डॉलर्सना विकली आहे. ते आता या कंपनीत ‘सह-मुख्य एआय अधिकारी’ (Co-Chief AI Officer) म्हणूनही रुजू होत आहेत. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस आणि भविष्यातील अनेक यशांसाठी खूप खूप शुभेच्छा, असं काँग्रेस नेते यश पाटील यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us