AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tulsi Vivah 2026 : ना आंबा, ना केळी… तुळशी विवाहात उसाच्याच कांड्यांचा मंडप का असतो? जाणून घ्या कारण

kartitki Ekadashi : आपण दरवर्षी तुळशीच्या लग्नाला अगदी आवडीने जातो. वाजत गाजत लग्नही लावतो. पण कधी विचार केलाय का? तुळशीभोवती मांडला जाणारा मंडप नेहमी उसाचाच का असतो? आंब्याच्या फांदीचा किंवा इतर कोणत्या झाडाचा का नसतो? जाणून घ्या सविस्तर

Tulsi Vivah 2026 :  ना आंबा, ना केळी…  तुळशी विवाहात उसाच्याच कांड्यांचा  मंडप का असतो? जाणून घ्या कारण
tulsi vivah 2026Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 20, 2026 | 5:55 PM
Share

तुळशी विवाह म्हटलं की घराघरात लगबग सुरू होते वृंदावनाचे सजावट केली जाते. तुळशी मातेला साडी नेसवली जाते आणि तिच्या भोवती उसाचा सुंदर मंडप उभारला जातो. पण कधी विचार केलाय का? की तुळशी विवाहात उसाचाच मंडप का घालतात. इतर झाडांच्या फांद्या किंवा लाकडाचा वापर का केला जात नाही? यामागे धार्मिक श्रद्धा शोभत्व आणि समृद्धीची जोडलेली परंपरा आहे.

उसाचा म्हणजे उभारणामागे काय कारण आहेत ?

हिंदू धर्मात ऊस हा गोडवा समृद्धी आणि भरभराटीचा प्रतीक मानला जातो. उसामध्ये गोड रस असतो. त्यामुळे तुळशी माता आणि भगवान विष्णू यांच्या विवाहातून प्रत्येकाच्या आयुष्यातही गोडवा, प्रेम आणि आनंद नांदावा, अशी भावना या परंपरेमागे जोडली जाते. वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध रहावे अशी प्रार्थना करत उसाच्या कांड्यांचा मंडप उभारला जातो.

लग्नाच्या मंडपाप्रमाणे असते सजावट

जसं घरातील लग्न सोहळ्यात वधूवरांसाठी सुंदर मंडप तयार केला जातो. अगदी तसाच तुळशी विवाहातही मंडप उभारण्याची परंपरा आहे. यासाठी साधारणपणे उसाच्या 4 कांड्या घेऊन तुळशी वृंदावनाच्या चारही बाजूंना लावल्या जातात. त्यावर फुले आंब्याची पाने आणि इतर सजावटीच्या वस्तू लावल्या जातात. त्यानंतर तुळशीमध्येचा विवाह शाळीग्राम शिळेची लावला जातो

शेतकरी संस्कृतीशीही जोडलेली परंपरा

ऊस हे महत्त्वाचं नगदी पीक आहे त्यापासून गुळ आणि साखर तयार केली जाते. त्यामुळे ग्रामीण भागात ऊसाला विशेष महत्त्व आहे शेतीतून मिळणारा उत्पन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि घरात धनधान्याची भरभराट व्हावी. अशी इच्छा व्यक्त करणे हा भाग या भावनाही या परंपरेशी जोडलेल्या आहेत. कार्तिक महिन्यात उसाचे पीक तयार होण्याच्या काळाशी हा सण जोडला जातो. त्यामुळे पूजेमध्ये ऊस आणि हंगामी फळांचा समावेश करून निसर्गाने दिलेला समृद्धी बद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते

तुळशी विवाह हा केवळ तुळशीचे रोप आणि शाळीग्राम यांचा विवाह नसून श्रद्धा आणि निसर्गाशी जोडलेला उत्सव आहे. तुळशीला पवित्र मानलं जात तर ऊस गोडवा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे दोन्हींचा समावेश असलेला विवाह सोहळा शुभ असतो.

Follow Us
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय