AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ujjwala Yojana: वर्षभरात अवघ्या 4 सिलेंडरवरच बोळवण… इतर गॅस टाकीवर सबसिडी का नाही? का घेण्यात आला हा निर्णय? त्या दाव्याने खळबळ

PM Ujjwala Yojana new update: पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत एलपीजी सिलेंडरची वार्षिक मर्यादा 9 वरून थेट 4 इतकी करण्यात आली आहे. या निर्णयावर नाराजी व्यक्त होत आहे. तर सरकारने या निर्णयानंतर स्पष्टीकरण दिले आहे.

Ujjwala Yojana: वर्षभरात अवघ्या 4 सिलेंडरवरच बोळवण... इतर गॅस टाकीवर सबसिडी का नाही? का घेण्यात आला हा निर्णय? त्या दाव्याने खळबळ
पीएम उज्ज्वला योजना Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 09, 2026 | 9:28 AM
Share

Ujjwala Yojana LPG Cylinder: पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत कोट्यवधी लाभार्थ्यांना मोठा झटका बसला. सरकराने सबसिडी, सवलतीच्या एलपीजी सिलेंडरविषयी एक निर्णय घेतला. त्यानुसार, वर्षभरात केवळ 4 सिलेंडरवर सबसिडी (Ujjwala LPG subsidy reduced to 4 cylinders) देण्याचे निश्चित झाले.पूर्वी 9 सिलेंडरवर सबसिडी देण्यात येत होती. मध्य-पूर्वेतील तणावामुळे हा निर्णय घेतल्याचे अनेकांना वाटत होते. सरकारने हा निर्णय का घेतला याचे स्पष्टीकरण दिले आहे.

सबसिडी सिलेंडरची संख्या आता 4 इतकी

वर्ष 2016 मध्ये उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत लाभार्थ्यांना 14.2 किलोचे 12 एलपीजी सिलेंडर सबसिडी मिळत होते. त्यानंतर ही संख्या कमी होऊन 9 इतकी करण्यात आली. तर आता नवीन निर्णयानुसार, लाभार्थ्यांना वर्षभरात केवळ 4 सिलेंडरवरच सबसिडी देण्यात येणार आहे.

का घेण्यात आला हा निर्णय?

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीणमल खनुजा यांनी याविषयीची माहिती माध्यमांना दिली आहे. त्यानुसार, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या वार्षिक सरासरी वापराच्या आधारे हा फैसला घेण्यात आला. त्याआधारे चार सिलेंडरवर सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला.सरकार लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार मदत देत आहे, त्याआधारेच हा निर्णय घेतल्याचे खनुजा यांनी स्पष केले. म्हणजे सरकारच्या मते उज्ज्वला योजनेचे लाभार्थी अधिक गॅस सिलेंडरचा वापर करत नाही, असा होतो.

सरकारने मे 2022 मध्ये उज्ज्वला योजनेतंर्गत प्रति सिलेंडर 200 रुपयांची सबसिडी सुरू केली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये वाढ करून ती 300 रुपये प्रति सिलेंडर इतकी करण्यात आली. सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते.

LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ

तर एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ (LPG Price Hike) करण्यात आली आहे. दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचा भाव वाढून 942 रुपये करण्यात आला आहे. तर 300 रुपयांची सबसिडी मिळाल्यानंतर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका सिलेंडरसाठी जवळपास 642 रुपये मोजावे लागतील. वाढते गॅस दर आणि सबसिडी कमी केल्यामुळे या योजनेतील लाभार्थी नाराज आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडरचा वापर कमी होण्याची शक्यता आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, एका एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर सरकारला जवळपास 1,600 रुपये खर्च येतो. यामध्ये लाभार्थ्यांना जवळपास 1,000 रुपये प्रति सिलेंडरची मदत देण्यात येत आहे. सरकारच्या दाव्यानुसार, वर्ष 2022 पासून ते आतापर्यंत जवळपास 52,000 कोटी रुपयांची एलपीजी सबसिडी देण्यात आली आहे.

कंपन्यांना कोट्यवधींचा फटका

अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, एलपीजीच्या किंमतीत 29 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यात 90 रुपयांची वाढ झाली आहे. तरीही आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशात घरगुती एलपीजीची किंमती कमी आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे कच्चे तेल आणि एलपीजीच्या जागतिक किंमतीत अत्यंत चढउतार दिसून येत आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी