सप्टेंबरपासून एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा निघणे बंद होणार? नक्की सत्य काय?

सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना सप्टेंबर 2025 पर्यंत एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली. या मागिल सत्य काय आहे? हे जाणून घेऊयात. 

सप्टेंबरपासून एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा निघणे बंद होणार? नक्की सत्य काय?
Will ATMs stop dispensing Rs 500 notes from September
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 13, 2025 | 1:50 PM

आजकाल ऑनलाईनमुळे फार कमीजण एटीममध्ये जाताना दिसतात. पण काहीजण अजूननही एटएममधून पैसे काढतात आणि कॅशनेच व्यवहार करतात. पण आजकाल एटीएममधून 100 आणि 200 रुपयांच्या नोटा देखील मोठ्या प्रमाणात येताना दिसतात. मात्र काही दिवसांपूर्वीपर्यंत बहुतेक वेळा 500 रुपयांच्या नोटा बाहेर येत असतं. किंवा बऱ्याच एटीएम मशीनमध्ये 500च्या नोटाच असलेल्या दिसतात. मात्र आता अशी एक बातमीस सध्या व्हायरल होत आहे की, एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा येणं बंद होणार आहे.

500 रुपयांच्या नोटा बंद होण्याच्या अफवा

सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना सप्टेंबर 2025 पर्यंत एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली. लोकांना याबाबत अनेक प्रश्न पडलेले आहेत. हे खरंच होणार आहे का? असे नेटकऱ्यांचे प्रश्नही व्हायरल होत आहेत. यामागील नक्की सत्य काय आहे ते जाणून घेऊयात.

खरंच 500 रुपयांच्या नोटा एटीएममधून निघणं बंद होणार?

तथ्य तपासणीत असे दिसून आले की हा दावा पूर्णपणे खोटा आहे. RBI ने अशी कोणतीही सूचना जारी केलेली नाही. हा मेसेज दिशाभूल करणारा आहे आणि लोकांमध्ये गोंधळ पसरवण्यासाठी व्हायरल केला जात आहे. सर्वसामान्य जनतेनं अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर अवलंबून राहण्याचा सल्ला दिला आहे. 500 रुपयांच्या नोटा पूर्णपणे वैध आहेत आणि व्यवहारात वापरही होणार आहे. आरबीआयने स्पष्ट के ले की या नोटांच्या वैधतेत कोणताही बदल झालेला नाही. बँका आणि एटीएममध्ये 500 रुपयांच्या नोटांचे वितरण नेहमीप्रमाणे सुरू राहील. अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांपासून लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, ज्यामुळे अनावश्यकपणे भीती आणि गोंधळ निर्माण होणार नाही.

योग्य माहिती कशी मिळवायची?

कोणतीही आर्थिक माहिती शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासणे महत्वाचे आहे. अशा अफवा टाळण्यासाठी, नेहमीच आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट (www.rbi.org.in) किंवा त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून माहिती मिळवा. जर कोणतीही संशयास्पद बातमी किंवा संदेश प्राप्त झाला तर ती ताबडतोब शेअर करणे टाळा. त्याऐवजी, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) सारख्या विश्वसनीय तथ्य तपासणी स्रोतांकडून माहितीची खात्री करा. चुकीची माहिती समाजात गोंधळ आणि भीती निर्माण करू शकते. म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून सतर्क राहण्याची गरज आहे.