Crude Oil: डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत… आता मोठे वक्तव्य… पेट्रोल -डिझेलच्या किंमती आपटणार?

Petrol And Diesel Price crash: इराण आणि अमेरिकेत ऐतिहासिक करार जवळपास होण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रप यांनी याविषयीचे संकेत देताच जागतिक बाजारात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. होर्मुज संकट संपल्यास पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Crude Oil: डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत... आता मोठे वक्तव्य... पेट्रोल -डिझेलच्या किंमती आपटणार?
पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त?
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 24, 2026 | 10:59 AM

Crude Oil Price Crash: कच्चा तेलाच्या भयावह किंमती आणि होर्मुज संकटामुळे जग वेठीस धरल्या गेले आहे. कच्चा तेलामुळे जगभर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. अनेक देशात महागाईचा स्फोट झाला आहे. तर शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे. इराणसोबतच्या कराराचा अंतिम मुसदा अंतिम टप्प्यात असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. लवकरच अखेरच्या मुद्यांवर सहमती होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अमेरिका आणि इराण शांती करार अंतिम टप्प्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या वक्तव्यामुळे जागतिक बाजारात मोठ्या हालचाली वाढल्या. होर्मुज स्ट्रीट उघडणार असल्याचे थेट संकेत मिळाल्याने कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची दाट शक्यता आहे. होर्मुज खुला झाल्याने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची आशा वाढली आहे. सध्या कच्चा तेलाची किंमती 100 डॉलर प्रति बॅरलहून अधिक आहे.

ट्रम्प यांनी दिले मोठे संकेत

डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यातच कच्चा तेलाच्या किंमतीत घसरणीचे संकेत दिले होते. कच्चा तेलाच्या किंमती लवकरच दणकावून आपटण्याचा दावा त्यांनी केला. इराणसोबतचे युद्ध लवकरच संपण्याचे संकेत त्यांनी दिले. तेहरान आमच्याशी करार करण्यासाठी उतावळा झाला आहे. इराणकडे मोठा तेल साठा आहे. शांतता करार पुढे गेल्यावर तेलाच्या किंमती जमिनीवर येतील. इराणचे कच्चे तेल बाजारात आल्यावर मोठी घसरण होण्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

अंतिम मुसद्दा, लवकरच घोषणा

इराण आणि अमेरिकेत लवकरच अंतिम मुसद्यावर सहमती होईल. आम्ही शांतता कराराच्या अगदी जवळ असल्याचा दावा शनिवारी ट्रम्प यांनी केला. आज रविवारी दोन्ही देशातील कराराविषयीची घोषणा होण्याचे संकेत समोर येत आहे. पण त्याचवेळी अमेरिकेच्या सर्व मागण्या पूर्ण होण्यावरही ट्रम्प यांनी जोर दिला. अंतिम कराराची घोषणा झाल्यावर इराणच्या जगभरात जप्त केलेल्या आणि गोठवलेल्या मालमत्ता परत करण्यात येतील. त्यांची बँक खात्यातील रक्कम मोकळी करण्यात येईल.

कच्चे तेल 100 डॉलरच्या पार

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलहून अधिक आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 104 डॉलर प्रति बॅरल तर WTI Crude Oil Price 97 डॉलरच्या जवळपास व्यापार करत आहे. मर्बन क्रूड ऑईलची किंमत 102 डॉलर प्रति बॅरलवर पोहचली आहे. यामुळे जगभरातील अनेक देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकल्या आहेत. अनेक देशात तेलाचा अपुरा आणि अनियमित साठा होत असल्याने नागरिक हैराण आहेत.

Follow Us