
आयकर रिटर्न (ITR) जमा करण्याची वेळ आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे. तुम्ही अजूनही आयटीआर भरला नसेल तर मग दोनच दिवस तुमच्या हाती आहेत. सध्या 15 सप्टेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे. सध्या अनेक करदाते ही अंतिम मुदत वाढणार आहे का, असा सवाल करत आहेत. लॉगिन ट्रॅफिक आणि तांत्रिक अडचणींमुळे लोकांना अखेरच्या क्षणी मोठा दिलासा हवा आहे. काय आहे याविषयीची अपडेट?
मुदत वाढविण्याची केली मोठी मागणी
आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर ही आहे. दरवर्षी ही अंतिम मुदत 31 जुलै अशी असते. पण सरकारनेच पहिल्यांदी ही मुदत सप्टेंपरपर्यंत वाढवली. आता अंतिम मुदत पण संपत आली आहे. तर करदाते आणि सनदी लेखपाल (CA) यांनी सरकारकडे आयटीआर भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली आहे. लाईव्हमिंटच्या वृत्तानुसार, आयकर रिटर्न भरताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आयटीआर प्रोसेसिंग करण्यासाठी वेळ लागत आहे. तर रिफंड स्टेट्स अपडेट करतानाही अडचणी येत आहेत.
गडबीडत काही करदाते चुकीचा आयटीआर भरण्याची भीती पण व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात नोटीस अथवा दंडाचा सामना करावा लागू शकतो. कर सल्लागार, तज्ज्ञानुसार, जर पोर्टलच्या तांत्रिक अडचणी दूर केल्या नाहीत अथवा वेळ वाढवला नाही तर करदात्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आतापर्यंत सरकारने अंतिम मुदत वाढविण्याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अथवा तसे संकेतही दिलेले नाहीत. त्यामुळे करदात्यांनी या दोन दिवसात आयकर भरण्याची घाई करणे फायद्याचे ठरेल.
कोणासाठी कोणता फॉर्म?
वेगवेगळ्या करदात्यांसाठी विविध फॉर्म आहेत. चुकीचा अर्ज निवडल्यास रिटर्न मंजूर होणार नाही. तुमच्या रिफंडला पण उशीर होईल. नोकरदारांसाठी ITR-1 वा ITR-2 फॉर्म आहे. व्यवसायिकांसाठी ITR-3 वा ITR-4 आणि कंपन्या, LLP आणि फर्मसाठी ITR-5, ITR-6 वा ITR-7 फॉर्म आहेत. वेळेत आयटीआर दाखल झाला तर दंड लागू शकतो.