AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women Investment : सोन्यात नाही जीव अडकला, या ठिकाणी शोधल्या गुंतवणुकीच्या वाटा, असा झाला खुलासा

Women Investment : एनरॉक या संस्थेने एक सर्वे केला. त्यातील निकाल अनेकांसाठी अनपेक्षित आहे. महिलांच्या मनात काय चाललंय हे लवकर कोणाला कळतं नाही. या सर्वेने बाजारातील तज्ज्ञांनाही हादरा दिला आहे. सर्वेक्षणानुसार गुंतवणुकीसाठी भारतीय महिला सोन्याला पहिली पसंती देत नाहीत. तर या ठिकाणी त्यांना गुंतवणुकीच्या वाटा शोधल्या आहेत.

Women Investment : सोन्यात नाही जीव अडकला, या ठिकाणी शोधल्या गुंतवणुकीच्या वाटा, असा झाला खुलासा
| Updated on: Mar 07, 2023 | 10:56 AM
Share

नवी दिल्ली : एनरॉक (Consultant Anarock) या संस्थेने एक सर्वे केला. त्यातील निकाल अनेकांसाठी अनपेक्षित आहे. महिलांच्या मनात काय चाललंय हे लवकर कोणाला कळतं नाही. या सर्वेने बाजारातील तज्ज्ञांनाही हादरा दिला आहे. महिलांचे सुवर्णप्रेम जगजाहीर आहे. त्यातही भारतीय महिलांना सोन्याचे खास आकर्षण आहे. सोन्याचा आभुषणाचा आणि दागिन्यांचे त्यांना वेड आहे. पण या सर्वेक्षणातील अहवाल या परंपरागत प्रतिमेला छेद देणारे आहेत. सर्वेक्षणानुसार गुंतवणुकीसाठी भारतीय महिलांनी सोन्याला पहिली पसंती दिलेली नाही. त्यांनी गुंतवणुकीसाठी नव्या वाटा चोखंदळल्या आहेत. या अहवालानुसार, 65 टक्के महिलांनी गुंतवणुकीसाठी बांधकाम क्षेत्राला (Real Estate) प्राधान्य दिले आहे. तर 20 टक्के महिलांनी शेअर बाजाराचा रस्ता धरला आहे. तर केवळ 8 टक्के महिलांनी सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. या ग्राहक सर्वेक्षणात जवळपास 5,500 लोकांनी सहभाग घेतला होता. त्यात 50 टक्के महिलांनी त्यांची बाजू मांडली.

याआधारे तयार करण्यात आलेल्या अहवालात गुंतवणुकीबाबत महिलांनी आता नवनवीन पर्याय शोधल्याचे समोर आले आहे. 65 टक्के महिलांना गुंतवणुकीसाठी बांधकाम क्षेत्र योग्य असल्याचे वाटत आहे. पण सध्या रिअल इस्टेट क्षेत्राला महागाईच्या झळा बसल्या आहेत. सातत्याने सदनिका आणि घरांच्या किंमती वाढत आहे. तरीही अनेक महिलांना गुंतवणुकीसाठी रिअल इस्टेटच योग्य पर्याय वाटत आहे.

या नवीन वर्षात शेअर बाजाराने अनेकांचे दिवाळे काढले आहेत. त्यांनी गुंतवणूक केलेले शेअर पुन्हा न वधारल्याने अनेकांना नुकसान सहन करावे लागेल आहे. त्यातच हिंडनबर्ग अहवालाने भारतीय शेअर बाजारात भयकंप आला. त्यात भारतीय शेअर बाजाराने गटंगळ्या खाल्या. पण 20 टक्के महिला आता शेअर बाजारात नियमीत गुंतवणूक करत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. किचकट आणि रुक्ष विषय असताना जोखीम घेण्याची हिंमत महिलांनी दाखवली आहे, हे कौतुकास्पद तर आहेच. पण महिलांचे भावविश्व, व्यवहार विश्व बदलत असल्याचा हा संकेत आहे.

आतापर्यंत महिला परंपरागत सोन्यातील गुंतवणुकीच्या मोहातून बाहेर पडल्या आहेत. केवळ 8 टक्के महिलांनी सोन्याला प्राधान्य दिल आहे. तर त्यानंतर 7 टक्के महिलांनी मुदत ठेवीत गुंतवणुकीला अग्रक्रम दिला आहे. याचा अर्थ महागाईला तोंड देण्यासाठी परंपरागत आयुध कामी येत नसल्याचे होम मिनिस्टरचा लक्षात आले आहे. त्यांची गुंतवणूक आणि बचत यांच्यातील संभ्रम दूर होत आहे.

एनरॉकच्या अभ्यास अहवालानुसार, 83 टक्के महिला 45 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या घरांचा शोध घेत आहे. जवळपास 36 टक्के महिला 45-90 लाख रुपये किंमतीच्या घर खरेदीला प्राधान्य देत आहे. तर 27 टक्के महिला 90 लाख रुपये ते 1.5 कोटी रुपयांच्या महागड्या घर खरेदीच्या प्रक्रियेत आहेत. पण 45 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतींच्या घरांना प्राधान्य देणाऱ्या महिलांची संख्या कमी असल्याचे दिसून आले.

यामागे अजून एक कारण समोर येत आहे. महिलांच्या नावे घर अथवा मालमत्ता घेतल्यास त्यांना स्टॅम्प ड्युटी कमी लागते. प्रत्येक राज्यात स्टॅम्प ड्युटीत कमी-अधिक तफावत दिसून येते. शहरी आणि ग्रामीण भागांच्या आधारेही त्यात फरक दिसून येतो. महिलांनी घर खरेदी केली तर दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा राज्यांनी स्टॅम्प ड्युटीत मोठी सूट, सवलत जाहीर केलेली आहे. तर एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी बँका महिलांना गृहकर्जात सवलत दिली आहे. त्याचाही फायदा अनेक ग्राहक घेतात.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.