Yes बँकेच्या FD च्या व्याजदरात बदल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर

| Updated on: Jun 10, 2021 | 2:45 PM

जर तुम्हीही Yes Bank मध्ये एफडी घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. (Yes Bank Fixed Deposit New Interest Rate)

Yes बँकेच्या FD च्या व्याजदरात बदल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर
yes bank
Follow us on

Yes Bank Fixed Deposit Rates मुंबई : खासगी क्षेत्रातील बँक Yes Bank ने आपल्या FD चे दर बदलले आहेत. येत्या 3 जूनपासून हे नवे दर लागू केले आहे. जर तुम्हीही Yes Bank मध्ये एफडी घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. (Yes Bank Fixed Deposit New Interest Rate)

नवे व्याजदर माहिती असणे गरजेचे

नव्या दरांनुसार बँक 7 दिवस ते 14 दिवसांच्या एफडीवर 3.5 टक्के व्याज देत आहे. तर 15 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के व्याज देत आहे. त्याशिवाय 9 महिन्यांपासून ते 1 वर्षाच्या एफडीवर 5.75 टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे. जर तुम्हालाही Yes Bank तील Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हे नवे व्याजदर माहिती असणे गरजेचे आहे.

?Yes Bank तील Fixed Deposit चे व्याजदर

(2 कोटींहून कमी रक्कमेच्या एफडीवर मिळणार इतका व्याज)

एफडीचा कालावधी                – व्याज

– 7 दिवस ते 14 दिवसांपर्यंत – 3.25 टक्के
– 15 दिवस ते 45 दिवसांपर्यंत – 3.50 टक्के
– 46 दिवस ते 90 दिवसांपर्यंत – 4 टक्के
– 3 महिन्यांपेक्षा जास्त पण 6 महिन्यांपेक्षा कमी – 4.50 टक्के
– 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक पण 9 महिन्यांपेक्षा कमी – 5 टक्के
– 9 महिने किंवा त्यापेक्षा अधिक पण 1 वर्षांहून कमी – 5.25 टक्के
– 1 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक पण 2 वर्षांहून कमी – 6 टक्के
– 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक पण 3 वर्षांहून कमी – 6.25 टक्के
– 3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक 10 वर्षांपर्यंत – 6.50 टक्के

?ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर

तर सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉईंटपेक्षा अधिक व्याज मिळतो. यात बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत मुदत ठेवींवर 3.75 टक्के ते 7.25 टक्के व्याज देते.

(Yes Bank Fixed Deposit New Interest Rate)

संबंधित बातम्या :

HDFC बँकेच्या FD च्या व्याजदरात बदल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर

Fixed Deposit Rates : विविध बँकांच्या FD च्या व्याजदरात बदल, काही महिन्यात दुप्पट होतील पैसे