AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांसाठी आतापासूनच अशी करु शकता गुंतवणूक, मोठी झाल्यावर तुम्हाला म्हणतील थँक्यू

Investment plan : आजकाल पालक आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करतात. मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडील आतापासूनच नियोजन करतात. तुम्ही देखील तुमच्या मुलासाठी गुंतवणूक करुन त्याचे भविष्य संरक्षित करु शकतात. काय आहे त्याचा पर्याय कुठे कराल गुंतवणूक?

मुलांसाठी आतापासूनच अशी करु शकता गुंतवणूक, मोठी झाल्यावर तुम्हाला म्हणतील थँक्यू
SIP for childrens
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 14, 2023 | 3:22 PM
Share

SIP for Childrens :  आजकाल पालक आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी ते लहान असल्यापासूनच मेहनत घेत असतात. मुलांना चांगले भविष्य द्यायचे असेल तर त्याची सोय आतापासूनच करावी लागेल. कारण मुलांच्या शिक्षणासाठी आता अफाट पैसा खर्च होतो. मुलांसाठी गुंतवणुकीचे नियोजन कसे सुरु करावे. मुलांसाठी आताच आर्थिक नियोजन केले तर ते मोठे होतील तोपर्यंत एक चांगली रक्कम त्यांच्या नावावर असेल. गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत पण एक पर्याय असा आहे जो चांगले रिटर्न देऊ शकतो.

एसआयपी मुलांसाठी योग्य

मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन खूप महत्तवाचे आहे. यासाठी म्युच्युअल फंड योग्य आहे. म्युच्युअल फंडमध्ये योग्य गुंतवणूक योजना (SIP) मुलाला करोडपती बनविण्यात मदत करेल. जर तुम्ही मुलाच्या जन्मानंतरच नियोजन केले तर 21 वर्षांनंतर मुलाकडे कोट्यावधींचा निधी नक्कीच असेल.

मुलांचे शिक्षण आणि लग्न या दोन्हींचे नियोजन आतापासूनच करा. त्यासाठी SIP सुरु करु शकता. एसआयपीमध्ये मिळालेल्या रिटर्न्समुळे मूल २१ वर्षांचे झाल्यावर तो करोडपती बनू शकतो. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी सर्वोत्तम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एसआयपी सरासरी १२ ते १६ टक्के परतावा देते. परंतु, काही प्रकरणांमध्ये त्याने 20-30 टक्के परतावाही दिला आहे.

मुलगा करोडपती कसा होईल?

बाळाचा जन्म होताच नियोजन सुरू करणे गरजेचे आहे. एक कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवा. दरमहिन्याला 10,000 रुपये गुंतवू शकता. असे तुम्ही 21 वर्षे केले. तर तुमची एकूण गुंतवणूक 25,20,000 रुपये असेल. परंतु, परताव्यासह त्याचे एकूण मूल्य 1,13,86,742 रुपये होईल. यामध्ये एकूण परतावा 88,66,742 रुपये असेल.

चांगला परतावा मिळण्याची ही शक्यता

आपण असे गृहीत धरले की SIP मधून तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला. तर तुमची एकूण गुंतवणूक फक्त 25,20,000 रुपये राहील. पण, मिळणारा परतावा खूपच अधिक असेल. 21 वर्षांनंतर, तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 3,86,84,626 रुपये होईल. यावरील परतावा 3,61,64,626 रुपये असेल.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना