Rest Points : कंपनी हवी तर अशी! डिलिव्हरी बॉयसाठी रिफ्रेश पॉईंट, थकल्यास आरामही करता येणार

| Updated on: Feb 18, 2023 | 8:46 PM

Rest Points : या फुड डिलिव्हरी कंपनीने दिवसभर उन्हातानात, पावसात काम करणाऱ्या डिलिव्हरी एजंटसाठी खास योजना आणली आहे. त्यानुसार आता त्यांना आराम करण्यासाठी खास रेस्ट पॉईंट्स असतील. याठिकाणी त्यांना रिफ्रेशही होता येईल.

Rest Points : कंपनी हवी तर अशी! डिलिव्हरी बॉयसाठी रिफ्रेश पॉईंट, थकल्यास आरामही करता येणार
Follow us on

नवी दिल्ली : सध्या डिलिव्हरी एजंट असो वा बॉय (Delivery Boy) त्यांना उन्हातान्हात, पावसात काम करावे लागते. अनेकदा त्यांना पाण्या-पावसात कुठेतरी आडोसा शोधावा लागतो. फुडची ऑडर (Food Order) घेण्यासाठी हॉटेलबाहेरील झाडाखाली वाट पहावी लागते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कधी थकल्यावरही त्यांना दोन क्षण विश्रांतीची योग्य जागा मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या कामावरही त्याचा परिणाम होतो. ग्राहकांना वेळेत फुड डिलिव्हरी करण्यासाठी त्यांना फिरावे लागते. त्यामुळे त्यांनाही मानवीय दृष्टिकोनातून थोडा वेळतरी विश्रांतीची (Rest) गरज असते. नेमकी हीच अडचण ओळखून झोमॅटो (Zomato) या फुड डिलिव्हरी कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अनेक बदल करण्यात येणार आहे.

झोमॅटोच्या द शेल्टर प्रकल्पातंर्गत ( The Shelter Project ) डिलिव्हरी एजेंटसाठी कंपनी लवकरच विश्रांतीच्या जागा तयार करणार आहे. या रेस्ट पॉईंट्सवर या एजेंटसाठी अनेक सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्यांना आराम तर करताच येईल. पण इतर सुविधाही मिळतील.
या माध्यमातून त्यांना सुरक्षित आणि आल्हाददायक वातावरणाचा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

झोमॅटोचे सीईओ यांनी डिलिव्हरी एजंटसाठी Rest Points तयार करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हे सार्वजिक ठिकाणी रेस्ट पॉईंट्स असतील. याठिकाणी डिलिव्हरी एंजटला आराम करता येईल. तसेच त्यांना रिफ्रेश होता येईल. कामाच्या दगदगीतून त्यांना फावला वेळ काढता येईल आणि याठिकाणी आराम करता येईल. थकवा घालविण्यासाठी काही वेळ थांबता येईल.

हे सुद्धा वाचा

या रेस्ट पॉईंट्सवर Zomato Delivery Partners साठी वायफाय, प्रथमोपचार पेटी, फोन चार्जिंगची सुविधा, वॉशरुम आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविण्यात येईल. विशेष म्हणजे इतर कंपन्यांचे, स्वीगीसारख्या कंपन्यांचे एजंटही या ठिकाणी आराम करु शकतील.

झोमॅटोला तिमाहीत मोठा तोटा सहन करावा लागला. डिसेंबरच्या तिमाहीत झोमॅटोचा घाटा वाढून 346.67 कोटी रुपयांवर पोहचला. गेल्यावर्षी कंपनीचा याच कालावधीतील घाटा 63 कोटी रुपये होता. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या कमाईत 75 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. कंपनीची कमाई 1948 कोटी रुपये झाली. तर गेल्या वर्षी हाच आकडा 1112 कोटी रुपये होता.

कंपनीने ग्राहकाभिमूख सेवा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, तसेच जलद सेवेचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आता कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आता शहरात अनेक ठिकाणी रेस्ट पॉईंट्स उघडण्यात येतील. याठिकाणी डिलिव्हरी एंजटला आराम करता येईल. तसेच त्यांना रिफ्रेश होता येईल.