रेल्वेत 12वी पास वाल्यांना उत्तम संधी, बघा कसं कधी कुठे करायचा अर्ज?
भरती आधी परीक्षा होईल. फिजिकल फिटनेसद्वारे ही निवड केली जाईल. परीक्षेला बोलावल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे घेऊन जायची आहेत. ही कागदपत्रे पडताळून झाल्यानंतरच तुम्हाला परीक्षा देता येणार आहे. याबद्दलची माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर मिळेल.

नवी दिल्ली: नोकरी शोधताय? रेल्वेमध्ये नोकरी करण्याची आहे इच्छा? मग ही बातमी शेवट्पर्यंत वाचा. दक्षिण रेल्वेकडून स्पोर्ट्स पर्सन पदांची भरती सुरु केली आहे. तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर यासाठी लवकर अर्ज करा. तुम्हाला अर्ज ऑनलाइन करता येणार आहे. कालपासून म्हणजेच 28 ऑक्टोबर 2023 ते 27 नोव्हेंबर 2023 तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला जर या नोकरी संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही rrcmas.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता. विशेष म्हणजे या भरती मध्ये एकूण 46 पदे भरली जाणार आहेत. तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर आजच अर्ज करा. सविस्तर माहिती खाली वाचा.
निवड प्रक्रिया
या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. जे पात्र असतील त्यांना परीक्षेसाठी बोलावलं जाणार आहे. भरती आधी परीक्षा होईल. फिजिकल फिटनेसद्वारे ही निवड केली जाईल. परीक्षेला बोलावल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे घेऊन जायची आहेत. ही कागदपत्रे पडताळून झाल्यानंतरच तुम्हाला परीक्षा देता येणार आहे. याबद्दलची माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर मिळेल. फिजिकल फिटनेस आणि उपयुक्तता बघून निवड होईल. एससी, एसटी, महिला, दिव्यांग आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये आणि सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये अर्ज शुल्क आहे.
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
बारावी पास. दहावी पास आणि दहावीनंतर काही कोर्स पूर्ण केलेले असतील तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकता. याशिवाय एनसीव्हीटी आणि एससीव्हीटीचे प्रमाणपत्र असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच दहावी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. तुम्ही जर या नोकरीसाठी इच्छुक असाल तर अधिकृत संकेतस्थळ बघत राहा त्यावर तुम्हाला माहिती मिळत राहील. मान्यताप्राप्त संस्थेतून तुम्ही जर पदवीधर असाल तरीही चालणार आहे.
- ऑफिशियल वेबसाईट – rrcmas.in यावर क्लिक करा
