
Job Openings in Indian Oil : सरकारी नोकरीच्या शोधात तुम्हीही असाल तर एक मोठी संधी चालून आली आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने तुमच्यासाठी सुवर्णसंधी आणली आहे. IOCLने 537 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. आणि यातील सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. तुमची गुणवत्ता, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीवर या पदांसाठी निवड आधारित असेल. मग तुम्ही 12 वी पास असा की, डिप्लोमा होल्डर किंवा मग ग्रॅज्युएट, सर्वांना इथे अपल्या करण्याची संधी आहे.
किती आहे व्हेकन्सी ?
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने विविध ट्रेड आणि विभागांमध्ये एकूण 537 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. विविध कौशल्ये आणि पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती आहे ज्यामध्ये टेक्निकल आणिनॉन-टेक्निकल दोन्ही नोकऱ्यांचा समावेश आहे. म्हणजेच, तुम्ही टेक्निकल क्षेत्रात असाल किंवा कार्यालयीन नोकरीत असाल, या भरतीमध्ये तुमच्यासाठी नक्कीच काही संधीआहेत तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही योग्य पदासाठी अर्ज करू शकता.
कोणकोणत्या पदासांठी आणि किती जागा आहेत ते जाणून घेऊया.
टेक्नीशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल): या कॅटेगीध्ये 138 पदांसठी भरती आहे.
टेक्नीशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल): इलेक्ट्रिकल क्षेत्रात रस असलेल्यांसाठी 135 पदे उपलब्ध आहेत.
टेक्नीशियन अप्रेंटिस (इंस्ट्रूमेंटेशन अँड टेलीकॉम): : या ट्रेडमध्ये 128 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
ट्रेड अप्रेंटिस (असिस्टंट – एचआर): ह्यूमन रिसोर्सशी निगडीत25 पदांसाठी व्हेकन्सी आहे.
ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट): अकाउंटिंग क्षेत्रातील 25 पदांसाठी भरती सुरू आहे.
डेटा एंट्री ऑपरेटर (फ्रेश अप्रेंटिस):नवीन उमेदवारांसाठी डेटा एंट्री ऑपरेटरच्या 43 पदे उपलब्ध आहेत.
डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर (स्किल सर्टिफिकेट होल्डर): स्किल सर्टिफिकेट असलेल्या उमेदवारांसाठी 43 पदे रिक्त आहेत.
एकूण पदं : सर्व कॅटेगरी मिळून एकूण 537 पदांसाठी भरती केली जात आहे.
ही भरती मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन सारख्या तांत्रिक क्षेत्रांपासून ते एचआर, अकाउंटिंग आणि डेटा एंट्री सारख्या नॉन-टेक्निकल क्षेत्रांसाठी आहे. जर तुमची पात्रता यापैकी कोणत्याही पदांसाठी असेल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही एक उत्तम संधी आहे. अचूक माहिती आणि अर्जासाठी, IOCL च्या अधिकृत वेबसाइट (iocl.com) वरील सूचना तपासू शकता.
कोण करू शकतं अप्लाय ?
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या पात्रता आवश्यक आहेत.
12 वी उत्तीर्ण: डेटा एंट्री ऑपरेटर (फ्रेश अप्रेंटिस) आणि डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर सारख्या पदांसाठी अर्ज करू शकतात.
इंजीनिअरिंग डिप्लोमा :मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि टेलिकॉमसाठी टेक्निशियन अप्रेंटिस अर्ज करू शकतात.
बॅचलर पदवी: ट्रेड अप्रेंटिस (सहाय्यक-एचआर, अकाउंटंट) सारख्या पदांसाठी अर्ज करू शकतात.
तुमची पात्रता यामध्ये बसते की नाही, याची खात्री नसेल तर तर IOCL च्या अधिकृत वेबसाइट (iocl.com) वर जाऊन सूचना तपासा. प्रत्येक पदासाठीच्या पात्रतेची संपूर्ण माहिती तेथे दिली आहे.
वय किती असावं ?
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये नोकरीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षे सूट, ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे सूट आणि पीडब्ल्यूबीडी (दिव्यांग) उमेदवारांना 10 वर्षे सूट मिळेल. वय अर्जाच्या शेवटच्या तारखेच्या आधारावर मोजले जाईल, म्हणून अधिसूचनेतील अंतिम तारीख तपासावी.
मासिक स्टायपेंड मिळेल
हा एक अप्रेंटिसशिप प्रोग्राम असल्याने, तुम्हाला अप्रेंटिसशिप कायद्यांतर्गत मासिक स्टायपेंड मिळेल. आयओसीएल सारख्या मोठ्या सरकारी कंपनीत, स्टायपेंड खूप चांगला असतो.नेमकी रक्कम जाणून घेण्यासाठी अधिकृत सूचना तपासा कारण ती पद आणि जागेनुसार थोडीशी बदलू शकते.
कसं होणार सिलेक्शन ?
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मधील रिक्त पदांसाठी निवड प्रक्रिया सोपी आणि सरळ आहे. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही. निवड प्रक्रिया खूप सोपी आहे. या पदांसाठी गुणवत्तेवर आधारित निवड होईल. तुमच्या शैक्षणिक पात्रतेच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल म्हणजेच तुमचे बारावी, डिप्लोमा किंवा पदवीचे गुण हे महत्त्वाची भूमिका बजावतील. याशिवाय, कागदपत्रांची पडताळणी देखील केली जाईल. गुणवत्ता यादीत आल्यानंतर, तुमचे सर्व प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे तपासली जातील. शेवटी, तुमची तंदुरुस्ती सुनिश्चित करण्यासाठी वैद्यकीय तपासणी केली जाईल. जर तुमचे गुण चांगले असतील आणि कागदपत्रे पूर्ण असतील तर तुमची निवड सहज होईल. फक्त तुमची माहिती काळजीपूर्वक भरा आणि कागदपत्रे तयार ठेवा.
ही कागदपत्र ठेवा तयार
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये अर्ज करण्यापूर्वी, ही कागदपत्रे तयार ठेवा, म्हणजे तुम्हाला नंतर धावपळ करावी लागणार नाही.
जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुमचे 10/SSC/मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका तयार ठेवा.
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र: 12 वी, डिप्लोमा किंवा पदवी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र.
जात प्रमाणपत्र: अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी उमेदवारांसाठी (लागू असल्यास).
जात वैधता प्रमाणपत्र: महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी (लागू असल्यास).
PwBD सर्टिफिकेट: दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग पात्रता प्रमाणपत्र.
EWS सर्टिफिकेट: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (लागू असल्यास).
पॅन कार्ड /आधार कार्ड: ओळख पटवण्यासाठी
नुकताचा काढलेला रंगीत पासपोर्ट साईज फोटो.
निळ्या शाईने केलेली सही – स्कॅन कॉपी तयार ठेवा
ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवा, कारण ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला ती अपलोड करावी लागतील.
अर्ज कसा कराल ?
IOCL मध्ये अर्ज करणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम आयओसीएलच्या अधिकृत वेबसाइट (iocl.com) वर जा. त्याच्या होमपेजवरील ‘करिअर’ विभागात जा आणि अर्ज करा.
( डिस्क्लेमर – ही माहिती उपलब्ध स्त्रोतांवरून देण्यात आली आहे.)