परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधूनच होणार उमेदवाराची निवड, पदवीधरांसाठी मोठी संधी, एअर इंडियाकडून विविध पदांसाठी भरती सुरू

AIATSL recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता खुशखबरी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधूनच होणार उमेदवाराची निवड, पदवीधरांसाठी मोठी संधी, एअर इंडियाकडून विविध पदांसाठी भरती सुरू
Air India (file photo)
| Updated on: Apr 01, 2024 | 2:41 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आता नो टेन्शनच असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. ही भरती विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट ही पदानुसार असणार आहे. खरोखरच ही मोठी संधीच आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती.

ही भरती प्रक्रिया एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध जागा या भरल्या जातील. हेच नाही तर थेट एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून 74 जागा या भरल्या जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे. परीक्षेचे नो टेन्शन उमेदवारांना असणार आहे. चला तर मग वेळ कशाला घालता लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 28 पर्यंत असावे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ही उमेदवाराकडे असावी. पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी आपण https://www.aiasl.in/index या साईटला भेट देऊ शकता, तिथेच तुम्हाला सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला कागदपत्रांसह 16, 17, 18, 19 एप्रिल 2024 रोजी उपस्थित राहवे लागेल. https://www.aiasl.in/resources/Recruitment%20Advertisement%20for%20Dehradun%20&%20Chandigarh%20Station..pdf येथे या भरती प्रक्रियेची अधिसूचना आपल्याला वाचायला मिळेल.