AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरती म्हणजे, भरती म्हणजे, भरती… ‘या’ बँकेत अर्ज करा, घसघशीत पगार घ्या; असा करा अर्ज

BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंटसह अनेक पदांच्या रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. तर या पदांसाठी उमेदवार १९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. तसेच मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

भरती म्हणजे, भरती म्हणजे, भरती... 'या' बँकेत अर्ज करा, घसघशीत पगार घ्या; असा करा अर्ज
BOB Recruitment 2024Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 05, 2024 | 4:16 PM
Share

बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी आता मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न तुम्ही पाहात असाल तर तुमच्यासाठी बँक ऑफ बडोदाने फायनान्स, एमएसएमई बँकिंग, डिजिटल अशा विविध बँकिंग क्षेत्रात काम करण्यासाठी ५९२ पदांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ३० ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाइट द्वारे पदांसाठी अर्ज करू शकतात.

रिक्त पदांचा तपशील

फायनान्समध्ये १ पद असून एमएसएमई बँकिंगमध्ये १४० पदे , डिजिटल ग्रुपमध्ये १३९ पदे, रिसिप्ट मॅनेजमेंटमध्ये २०२ पदे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ३२ आणि कॉर्पोरेट आणि इन्स्टिट्यूशनल लोनमध्ये ७९ पदांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त मॅनेजर, असिस्टंट व्हाईसप्रेसिडेंट, रिलेशनशिप मॅनेजर, प्रॉडक्ट हेड अशी अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे.

पात्रता, निकष, वयोमर्यादा

बिझनेस फायनान्स मॅनेजर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सीए किंवा एमबीए पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एमएसएमई रिलेशनशिप मॅनेजर पदांसाठी अर्जदाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय २२ वर्षे ते ४५ वर्षा दरम्यान असावे. इतर पदांवरील पात्रतेशी संबंधित माहितीसाठी उमेदवार बँकेने जारी केलेली अधिकृत अधिसूचना तपासावी.

पदांसाठी अर्ज कसा करावा ते येथे पहा

बँक ऑफ बडोदा बँकेच्या bankofbaroda.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

होम पेजवर दिलेल्या ‘करिअर’ टॅबवर जा.

आता येथे नोटिफिकेशन वाचा आणि अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

तपशील प्रविष्ट करून कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज शुल्क भरा.

अर्ज जमा करा.

अर्ज शुल्क

जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ६०० रुपये भरावे लागणार आहेत. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

निवड प्रक्रिया

या सर्व पदांसाठी अर्जदारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. तसेच शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. बँकेकडून अद्याप मुलाखतीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?.
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य.
मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण....खडसे काय बोलून गेले?
मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण....खडसे काय बोलून गेले?.
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?.
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....