Mumbai : राज्यपालांच्या हस्ते करोनाकाळात इनोव्हेशन करणाऱ्या विविध क्षेत्रातील उद्यमींचा सत्कार

| Updated on: Dec 18, 2021 | 8:12 PM

करोना काळात विविध क्षेत्रांमध्ये इनोव्हेशन करून देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या इनोव्हेटीव्ह उद्योजकांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ‘इम्पॅक्ट क्रिएटर्स अवार्ड’ देऊन सन्मान करण्यात आला.

Mumbai : राज्यपालांच्या हस्ते करोनाकाळात इनोव्हेशन करणाऱ्या विविध क्षेत्रातील उद्यमींचा सत्कार
Follow us on

मुंबई : एकविसावे शतक भारताचे असेल आणि देशातील युवा नवोन्मेषक हे परिवर्तन घडवून आणतील असे सांगताना इनोव्हेशन विनाशकारी नसावे तर ते संरचनात्मक, मानवतेच्या कल्याणासाठी असावे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले आहेत. करोना काळात विविध क्षेत्रांमध्ये इनोव्हेशन करून देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या इनोव्हेटीव्ह उद्योजकांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ‘इम्पॅक्ट क्रिएटर्स अवार्ड’ देऊन सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

इनोव्हेशनला ज्ञान, अध्यात्माची जोड द्या

या कार्यक्रमाचे आयोजन ‘बिलेनियम डिवाज’ या महिला उद्योजिकांच्या संस्थेने केले होते. कार्यक्रमाला भारत सरकारचे मुख्य नवोन्मेषन अधिकारी डॉ अभय जेरे, बिलेनियम डिवाज संस्थेच्या अध्यक्षा श्वेता शालिनी, संचालक भावेश कोठारी, सहसंचालिका मीनल कोठारी आणि दीपिका सिंह उपस्थित होते. विज्ञान व तंत्रज्ञानातील स्थित्यंतरे अतिशय गतीने होत असून पूर्वी परवलीचा शब्द असलेला संशोधन हा शब्द मागे पडून नॅनोतंत्रज्ञान आणि अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता हे शब्द परवलीचे झाले आहेत असे सांगताना विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनला भारतीय ज्ञान, अध्यात्माची जोड दिली तर इनोव्हेशनचे कार्य अधिक शाश्वत आणि हितकर होईल असे राज्यपालांनी सांगितले.

नवी शिक्षण प्रणाली ‘रँछो’ निर्माण करणारी असावी

चीन, अमेरिकेनंतर भारत ही जगातील तिसरी मोठी इनोव्हेशन प्रणाली म्हणून उदयास आली आहे. मात्र बौद्धिक मालमत्ता नोंदणीच्या बाबतीत भारत फार मागे आहे. चीन दरवर्षी 15 लाख पेटंट नोंदवित आहे तर भारत केवळ पन्नास हजार नोंदवित असल्याचे नमूद करून भारतीय शिक्षण प्रणालीने इनोव्हेशन करणारे ‘रँछो’ निर्माण केले पाहिजे, असे भारत सरकारचे मुख्य इनोव्हेशन अधिकारी डॉ, अभय जेरे यांनी यावेळी सांगितले. भारतात 40,000 शिक्षण संस्था असून अंशी टक्क्यांहून अधिक संस्थांनी आजवर एकही पेटंट नोंदविले नाही, ही चिंतेची बाब असल्याचे सांगताना भारताला जगद्गुरू करायचे असेल तर जागतिक स्तरावर परिणाम करू शकतील अश्या नवकल्पना निर्माण कराव्या लागतील, असे जेरे यांनी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी आर्थिक समावेशन, संशोधन, आरोग्य, सेवा, उद्योग आदी क्षेत्रातील 35 नवोन्मेषकांचा आणि उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य अधिकारी आशिष चौहान, बिर्ला समूहाच्या नीरजा बिर्ला, डॉ बत्रा क्लिनिकचे डॉ अक्षय बत्रा, डॉ राधाकृष्णन पिल्लई आदींचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Beed : ही निवडणूक काळी निवडणूक, ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

Mumbai : 9 वर्षात 7.58 लाख मुंबईकरांनी एमटीएनएलच्या लँडलाईन सेवेस ठोकला रामराम

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा