AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

अनिल परब यांनी आपल्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत आपलं आणि आपल्या मुलाचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी रामदास कदम आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय.

'तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं', रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा
रामदास कदम, नितेश राणे
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 7:51 PM
Share

सिंधुदुर्ग : ‘त्या’ कथित ऑडिओ क्लिपवरुन मागील काही दिवसांपासून डाववलं जात असलेले शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आज आपली खदखद माध्यमांसमोर व्यक्त केली. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अनिल परब यांनी आपल्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत आपलं आणि आपल्या मुलाचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रामदास कदम आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय.

‘उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही’

‘राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा याच रामदास कदमांना उद्धव ठाकरेंनी विरोधीपक्ष नेता बनवलं होतं. तेव्हा ते जिभेला हाड नसल्यासारखे आमच्यावर बोलायचे. आता कदमांसारख्या असंख्य शिवसैनिकांनी विचार करावा की, उद्धव ठाकरे तुम्हाला कसे वापरून घेतात. जेव्हा तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखे थुंकतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामदास कदम. आज मी रामदास कदमांना सांगेन की, तुमची आज काय अवस्था झाली आहे. तुम्ही आज राजकारणामध्ये कुठेच नाहीत आणि राणे साहेब केंद्रात मंत्री आहेत. या फरकाचा रामदास कदमांनी विचार करावा. उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला आहे. असंख्य शिवसैनिकांनी रामदास कदम या घटनेचा बोध घ्यायला पाहिजे’, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केलीय.

‘चार-पाच टाळक्यांनी शिवसेनेला हायजॅक केली’

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब? रामदास कदमांनी हा योग्य प्रश्न केला आहे. शिवसेना ही उद्धव ठाकरे चालवत नाहीत तर अनिल परब, आदेश बांदेकर, अनिल देसाई, वरुण सरदेसाई यांसारखे बिनकामाचे जे लोंबते आहेत ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. सामान्य आणि कडवट शिवसैनिकाला स्थान उरलेलं नाही. चार-पाच टाळक्यांनी शिवसेनेला हायजॅक केली असल्याचा घणाघातही राणेंनी केलाय.

शिवसैनिकावरील हल्ल्याचे आरोप फेटाळले

दुसरीकडे कणकवली येथील शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याबाबत नितेश राणे यांनी आरोप फेटाळले आहेत. विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्या मधील भांडणाचा आजचा (हल्ल्याचा) परिणाम आहे. किरण सामंत यांना खासदारकीची स्वप्ने पडत आहेत. दापोली काय आणि सिंधुदुर्ग काय, सामान्य शिवसैनिकात असलेली खदखद बाहेर पडत आहे. त्याला कोणाचं तरी नाव द्यायचं म्हणून नितेश राणे. किरण सामंत आणि विनायक राऊत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरू आहे. त्याचेच हे पडसाद आहेत, असंही नितेश राणे यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

Video : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणानंतर शिवसेना आक्रमक, भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन, कर्नाटक सरकारला इशारा

Attack on Shiv Sena Activist | शिवसेना कार्यकर्त्यावर कणकवलीत तलवारीनं हल्ला! हल्ल्यामागे राणेंचा हात?

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...