Video : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणानंतर शिवसेना आक्रमक, भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन, कर्नाटक सरकारला इशारा

दक्षिण मुंबईत आज संध्याकाळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक गोळा झाले. त्यावेळी त्यांनी भाजप प्रदेश कार्यालयाबाबत बोम्मई यांच्या निषेधाचे बॅनर झकावले. तसंच भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

Video : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणानंतर शिवसेना आक्रमक, भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन, कर्नाटक सरकारला इशारा
भाजप कार्यालयावर शिवसेनेचे आंदोलन
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 7:04 PM

मुंबई : कर्नाटकातील (Karnatak) बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी विटंबना ही छोटी गोष्ट असल्याचं वक्तव्य केलं आहे. या प्रकारामुळे राज्यात शिवसेना आणि शिवप्रेमी चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबईत आज भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. पांडुरंग सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध व्यक्त केला.

दक्षिण मुंबईत आज संध्याकाळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक गोळा झाले. त्यावेळी त्यांनी भाजप प्रदेश कार्यालयाबाबत बोम्मई यांच्या निषेधाचे बॅनर झकावले. तसंच भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ‘बोम्मई म्हणतात की अशा छोट्यामोठ्या गोष्टी होत असतात. म्हणजे शिवाजी महाराज हे छोटी-मोठी गोष्ट आहेत का? मग भाजपचं शिवरायांवरील प्रेम बेगडी आहे का? या गोष्टीचा फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण हिंदुस्तानात निषेध व्यक्त केला पाहिजे. कर्नाटक सरकार जर माफी मागणार नसेल तर त्यांच्या बसेस महाराष्ट्रात येतात. त्याचा त्यांनी विचार करावा, असा सूचक इशारा पांडुरंग सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय. दरम्यान, भाजप कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शिवसैनिकांनी आपल्याला शिविगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

नेमकं काय म्हणाले बोम्मई?

रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीनं जे केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेलं, तर कारवाई ही होणारचं. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केलं जाणार नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इतर बातम्या :

‘त्या’ ऑडिओ क्लिप खोट्या असल्याचं कोर्टात सिद्ध करून दाखवाच; सूर्यकांत दळवींचं कदमांना आव्हान

Beed : 26 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार, पंकजा मुंडेंची मोठी घोषणा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.