Teacher Recruitment 2021: मुंबई महापालिकेत डीनबी शिक्षक पदासाठी 25 जागांची भरती, अर्ज कुठं करायचा?

Teacher Recruitment 2021: मुंबई महापालिकेत डीनबी शिक्षक पदासाठी 25 जागांची भरती, अर्ज कुठं करायचा?
प्रातिनिधीक फोटो

मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात 25 डीनएबी शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी तत्त्वावर करण्यात येत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Nov 13, 2021 | 11:17 AM

मुंबई: मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात 25 डीनएबी शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी तत्त्वावर करण्यात येत आहे. 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. पात्र उमदेवारांनी लोकम्यान टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयातून अर्ज विकत घेऊन सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अर्ज कधी आणि कुठे करावा?

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात 25 डीनएबी शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज महाविद्यालयाच्या तळ मजला रोख विभाग खोली क्रमांक 15 येथे अर्ज मिळेल. 22 नोव्हेंबर दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील.

25 जागांसाठी भरती

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात 25 डीनएबी ग्रेड 1 आणि डीएनबी ग्रेड 2 विषयातील शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येत आहे.

अर्जाचं शुल्क

डीनएबी शिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथून 315 रुपये शुल्क सादर करुन विकत घ्यायचे आहेत. अर्जामधील आवश्यक माहिती नोंदवून अर्ज सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

पात्र उमदेवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर अर्जांची छाननी केल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. मुलाखतीची वेळ नंतर कळवली जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमदेवारंनी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या संपर्कात राहणं आवश्यक आहे.

संबंधित बातम्या:

Indian Air Force Recruitment 2021: भारतीय वायू सेनेत ‘ग्रुप सी’ मधील 82 पदांसाठी भरती

India Post Recruitment 2021: महाराष्ट्र सर्कलमध्ये स्पोर्टस कोट्यातील 257 जागांसाठी भरती, दहावी- बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी

BMC municipal corporation Lokmanya Tilak Hospital recruitment for 25 post check details here

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें