AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Post Recruitment 2021: महाराष्ट्र सर्कलमध्ये स्पोर्टस कोट्यातील 257 जागांसाठी भरती, दहावी- बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी

भारतीय पोस्ट विभागानं महाराष्ट्र सर्कलसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. पोस्टानं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं महाराष्ट्र सर्कलमध्ये स्पोर्टस कोट्यातील 257 जागांवर भरती होणार आहे.

India Post Recruitment 2021: महाराष्ट्र सर्कलमध्ये स्पोर्टस कोट्यातील 257 जागांसाठी भरती, दहावी- बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 7:40 AM
Share

मुंबई: भारतीय पोस्ट विभागानं महाराष्ट्र सर्कलसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. पोस्टानं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं महाराष्ट्र सर्कलमध्ये स्पोर्टस कोट्यातील 257 जागांवर भरती होणार आहे. पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://www.dopsportsrecruitment.in/ वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज प्राप्त झाल्यानंतर दहावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवलं जाईल.

अर्ज कधी आणि कुठे करावा?

भारतीय पोस्टाकडून जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार https://www.dopsportsrecruitment.in/ या वेबसाईटवर 27 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल. उमेदवार पोस्टाच्या पोर्टलवर एकदा नोंदणी करु शकेल. नोंदणी क्रमांकाद्वारे विविध सर्कलमधील भरतीसाठी अर्ज करु शकतो.

257 जागांसाठी भरती

पोस्टल असिस्टंट (93), सॉर्टिंग असिस्टंट (09), पोस्टमन (113), मल्टी टास्किंग स्टाफ (42) अशा 257 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी आणि बारावी पास असणे आवश्यक आहे. यासह उमेदवारांना सायकलिंग देखील यायला हवे. जर कोणी दुचाकी चालवत असेल तर तो सा यकल चालवित असल्याचे मानले जाईल. पोस्टानं जाहीर केल्यानुसार स्पोर्टस कोट्यासाठी निश्चित करण्यात आलेली पात्रता उमेदवारांची असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि शुल्क

या पदांवर भरती होण्यासाठी वय 18 ते 27 वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. एससी आणि एसटीसाठी 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमदेवारांसाठी 3 वर्ष वाढवून दिली जातील. अर्जाची फी 200 रुपये आकारण्यात येईल.

अर्ज कसा करायचा?

टपाल विभागाच्या भर्ती पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या अद्ययावत माहितीनुसार अर्ज, नोंदणी फी, अर्ज भरणे आणि अर्ज सादर करणे या तीन टप्प्यात अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाईल. भरती पोर्टलला भेट दिल्यानंतर, उमेदवारांनी प्रथम नोंदणीच्या लिंकवर क्लिक करून संबंधित पृष्ठावर जाणे आवश्यक आहे आणि त्यानंतर आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवारांना त्यांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात सक्षम होईल. यानंतर, उमेदवारांनी नोंदणीकृत नोंदणी क्रमांकाद्वारे विहित अर्ज फी ऑनलाईन भरावी लागेल. फी भरल्यानंतर उमेदवार ऑनलाईन लिंकवर अॅप्लिकेशन ऑनलाईन लिंक वर क्लिक करुन अर्ज सबमिशन पृष्ठावर जाऊ शकतात आणि आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवारांना त्यांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

संबंधित बातम्या:

‘डीएपी’ कृत्रिम टंचाई, नांदेडमध्ये दोन विक्रेत्यांचे परवाने निलंबित, कृषी विभागाची कारवाई

सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ‘MBBS’च्या 100 जागांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मंजुरी, बाळासाहेब पाटील यांची माहिती

Maharashtra Postal circle recruitment for 257 post click here for full details

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.