‘डीएपी’ कृत्रिम टंचाई, नांदेडमध्ये दोन विक्रेत्यांचे परवाने निलंबित, कृषी विभागाची कारवाई

केंद्र सरकारकडून पुरवठा होऊनही स्थानिक पातळीवर 18:46 खताचा तुटवडा भासत होता. शिवाय नांदेड जिल्ह्यात कृत्रिम टंचाई नसल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. त्यानंतर आता अधिकची कमाई करण्याच्या उद्देशाने कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील दोन खतविक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

'डीएपी' कृत्रिम टंचाई, नांदेडमध्ये दोन विक्रेत्यांचे परवाने निलंबित, कृषी विभागाची कारवाई
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 5:08 PM

नांदेड : ऐन रब्बी हंगामाची लगबग सुरु असतानाच गेल्या काही दिवसांपासून राज्यात डीएपी अर्थात 18:46 या खताचा तुटवडा निर्माण झाला होता. दरवर्षी ऐन हंगामातच टंचाई निर्माण होत असते. यावेळी मात्र, केंद्र सरकारकडून पुरवठा होऊनही स्थानिक पातळीवर 18:46 खताचा तुटवडा भासत होता. शिवाय नांदेड जिल्ह्यात कृत्रिम टंचाई नसल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. त्यानंतर आता अधिकची कमाई करण्याच्या उद्देशाने कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील दोन खतविक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

डीएपी खताचा पुरवठा हा जिल्ह्याच्या मागणीनुसार महिन्याकरिता केंद्र सरकारकडून पाठविला जातो. यंदा मागणीपेक्षा अधिकचा साठा हा महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे. मात्र, उत्तरप्रदेश येथील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या राज्यात अधिकचे खत पाठवले असल्याचा आरोप होत आहे.

डीएपी (18:46) खतालाच अधिकची मागणी

खताच्या माऱ्याशिवाय उत्पादनात वाढ होत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण आजही डीएपी खतालाच अधिकची मागणी आहे. ज्याला अधिकची मागणी त्याचाच पुरवठा कमी असेच गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. पण या खतामुळे उत्पादनात वाढ होते असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. अनेक पर्याय समोर असतानाही डीएपी खतालाच अधिकची मागणी असते.

काल निर्वाळा आज कारवाई

नांदेड जिल्ह्यात कृत्रिम टंचाई नाही तर महिन्याकाठी होणारा पुरवठाच झाला नसल्याचे सीड्‌स फर्टिलायझर व खत विक्रेत्यांनी सांगितले होते. मात्र, अचानक निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे कृषी विकास अधिकारी डॉ.तानाजी चिमनशेट्टे यांनी धर्माबाद तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र पवार, पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्‍वास अधापुरे यांना खत विक्रेत्यांची तपासणी केली असता यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे धर्माबाद येथील राजेश सीड्‌स अँड फर्टिलायझर आणि महाजन ट्रेडर्स यांचे खत परवाण्याचे निलंबन केले आहे.

18:46 (डीएपी) वर काय पर्याय आहे

शेतकऱ्यांची मानसिकताच झाली आहे की 18:46 या खतानेच पिकाला चांगला उतार येतो. याच मानसिकतेचा फायदा खत विक्रेते घेत आहेत. या खताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने त्याची विक्री करतात. मात्र, 18:46 हे खत जरी सहज उपलब्ध नाही झाले तरी 10:26:26, 12:32:16, 15:15, 20:20:00 या खतांचा पर्यांय शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय मिश्र खतांचा वारर करुनही भरघोस उत्पादन घेता येते. मात्र शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलण्यााची आवश्यकता आहे. अखेर कृषी विद्यापीठाने शिफारस केलेसे रेशिओ खते आहेत त्यामध्ये नायट्रोजन, फॅास्परस यांचे मिश्रण करुनही वापर करता येत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

केळी बागांना ‘बंची टॅाप’ विषाणूचा धोका, योग्य व्यवस्थापन गरजेचे अन्यथा उत्पादनात घट

तारण योजनेने शेतकऱ्यांना ‘तारले’, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा भर सोयाबीनवर

Positive News: शेतकऱ्यांच्या मनात तेच होणार का बाजारात ? सोयाबीनच्या दराबाबत आशादायी चित्र

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.