AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारण योजनेने शेतकऱ्यांना ‘तारले’, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा भर सोयाबीनवर

शेतीमाल तारण योजनेचे महत्व काय आहे ? हे यंदा शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. अत्यंत प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याने आता शेतीमालाला योग्य दर मिळण्यास त्याचा उपयोग होणार आहे. खरिपातील पिकांचे दर कमी झाले होते शिवाय शेतकऱ्यांना पैशाचीही आवश्यकता होती त्या दरम्यान, शेतकऱ्यांना या शेतीमाल तारण योजनेचा लाभ झाला आहे.

तारण योजनेने शेतकऱ्यांना 'तारले', मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा भर सोयाबीनवर
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 12, 2021 | 3:40 PM
Share

लातूर : (Agricultural Mortgage Scheme) शेतीमाल तारण योजनेचे महत्व काय आहे ? हे (Benefits of Farmers) यंदा शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. अत्यंत प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याने आता (Storage of Agricultural Produce) शेतीमालाला योग्य दर मिळण्यास त्याचा उपयोग होणार आहे. खरिपातील पिकांचे दर कमी झाले होते शिवाय शेतकऱ्यांना पैशाचीही आवश्यकता होती त्या दरम्यान, शेतकऱ्यांना या शेतीमाल तारण योजनेचा लाभ झाला आहे. कमी भावामुळे होणारे नुकसान तर टळले आहेच शिवाय शेतकऱ्यांना शेतीमाल साठणूक, बाजारपेठेच्या अभ्यासाद्वारे शेतीमाल विक्री कधी आणि केव्हा करावी या बाबतची माहिती कार्यशाळा देखील वखार महामंडळाच्यावतीने घेण्यात आली होती.

त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे. राज्य वखार महामंडळाच्यावतीने शेतीमाल तारण योजना ही राबवण्यात येत आहे. यंदा खरिपातील सोयाबीनचे दर कोसळल्यानेच ही योजना काय असते याची माहिती शेतकऱ्यांनाही झाली. त्यामुळेच शेतीमालाची साठवणूक झाली शिवाय योग्य दर मिळाला की त्याची विक्री करणेही शक्य झाले होते.

शेतीमालावर मिळते कर्ज

1.शेतमाल प्रकार : सुर्यफूल, सोयाबीन, तुर, उडीद, भात , करडई, मुग, हळद, चना या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

2. शेतमाल प्रकार : मका,ज्वारी, गहू, बाजरी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

3. शेतमाल प्रकार : काजू बी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

4. शेतमाल प्रकार : बेदाणा या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

लातूरमध्ये सोयाबीनवरच भर

येथील कृषी उत्पन्न परिसरातच हे शेतीमाल तारण केंद्र उभारण्यात आले होते. शिवाय जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन हे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणले जाते. मात्र, मध्यंतरी सोयाबीनचे दर घटल्याने शेतकऱ्यांनी शेतीमाल तारण योजनेचा लाभ घेतला. लातूर विभागात 211 शेतकऱ्यांनी 4 कोटी 99 लाख रुपये हे वेगवेगळ्या पिकांच्या साठवणुकीवर कर्ज घतले तर यापैकी 103 शेतकरी हे सोयाबीन उत्पादक होते. त्यांनी 1 कोटी 62 लाख रुपये कर्ज घेतलेले आहे. आता सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होत आहे. त्यामुळे आता जर साठवलेल्या सोयाबीनची विक्री केली तर शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरणार आहे.

वखार महामंडळाची जनजागृती

शेतीमाल तारण कर्ज या माध्यमातून शेतीमालाची साठवणूक करता येते शिवाय कर्जही मिळते. मात्र, याबाबत जनजागृती नसल्याने वखार महामंडाळाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या सर्व योजनांची माहीती देण्यासाठी वखार आपल्या दारी हे अभियान राबवले जाणार आहे. 15 जिल्ह्यात हे अभियान राबवले जाणार असून सोमवारपासून उस्मानाबाद येथून या अभियानाला सुरवात झाली होती.

संबंधित बातम्या :

Positive News: शेतकऱ्यांच्या मनात तेच होणार का बाजारात ? सोयाबीनच्या दराबाबत आशादायी चित्र

सोयबीन प्रमाणेच कापसाची अवस्था, भाव वाढीच्या अपेक्षेनं साठवणूकीवरच भर

ढगाळ वातावरणाचा ‘या’ तीन मुख्य पिकांना धोका, काय आहे उपाययोजना ?

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...