सोयाबीन प्रमाणेच कापसाची अवस्था, भाव वाढीच्या अपेक्षेनं साठवणूकीवरच भर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 12, 2021 | 6:49 PM

कापसाला अधिकचा दर म्हणून त्याची आवक जास्त असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे ठरणार आहे. आणि सोयाबीनला आजचा दर उद्या मिळतो की नाही म्हणूनही आवक वाढतेय असेही नाही. उलट या दोन्हीहा नगदी पिकांची आवक ही घटत आहे. कारण या पिकांच्या दराला घेऊन शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे 8 हजार 500 वर असलेला कापूस 10 हजार रुपये प्रति क्विंटलवर जाण्याची अपेक्षा आहे तर सोयाबीन आज ना उद्या 6 हजारावर जाण्याची अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.

सोयाबीन प्रमाणेच कापसाची अवस्था, भाव वाढीच्या अपेक्षेनं साठवणूकीवरच भर
संग्रहीत छायाचित्र
Follow us

लातूर :  खरिपातील दोन मुख्य पिकांची बाजारपेठेत आवक सुरु आहे. एकतर सोयाबीनचे दर दिवसेंदिवस घटत आहेत तर दुसरीकडे कापसाच्या दरात मोठी सुधारणा आहे. मात्र, कापसाला अधिकचा दर म्हणून त्याची आवक जास्त असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे ठरणार आहे. आणि सोयाबीनला आजचा दर उद्या मिळतो की नाही म्हणूनही आवक वाढतेय असेही नाही. उलट या दोन्हीहा नगदी पिकांची आवक ही घटत आहे. कारण या पिकांच्या दराला घेऊन शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे 8 हजार 500 वर असलेला कापूस 10 हजार रुपये प्रति क्विंटलवर जाण्याची अपेक्षा आहे तर सोयाबीन आज ना उद्या 6 हजारावर जाण्याची अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. यामुळे दर असूनही कापसाची आवक नाही तर वाढीव दराच्या अपेक्षेने सोयाबीनची आवकही कमीच होत आहे.

हंगामाच्या सुरवातीपासून केवळ मुहूर्ताचा भाव सोडला तर सोयाबीनचे दर वाढलेलेच नाहीत. उलट त्यामध्ये मध्यंतरी घट झाली होती. आता दिवाळीनंतर सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत. सोयाबीनला सरासरी 5 हजाराचा दर मिळत आहे. मात्र, असे असतानाही शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा आहे. ही दोन्हीही पिके खरिपातील असून वाढत्या दराबाबत शेतकरी आशादायी आहे. म्हणूनच या पिकांची आवक घटत आहे.

सोयाबीनचे दर 5 हजारावर स्थिर

खरीप हंगामातील सोयाबीन हे मुख्य पिक आहे. यंदा मात्र, पेरणीपासूनच सोयाबीन हे धोक्यात होते. अखेर अंतिम टप्प्यात असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर सोयाबीनच्या दरातही कमालीची घट झाली होती. 4 हजार 500 रुपये क्विंटलवर दर आले होते. मात्र, आता सोयाबीन हे 5 हजारावर स्थिरावले आहे. गतवर्षी सोयाबीन हे 4 ते 4 हजार 500 रुपयांनी शेतकऱ्यांनी विकले होते. मात्र, आता 5 हजार 200 दर असतानाही शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिलेला आहे. भविष्यात दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

कापसाचे दर वाढले पण शेतकऱ्यांच्या अपेक्षाही वाढल्या

कधी नव्हे ते कापसाला 9 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. असे असले तरी दुसरीकडे कापसाच्या उत्पादनात 40 टक्के घट झालेली आहे. मध्यंतरीचा पाऊस आणि त्यानंतर बोंड अळीचा प्रादुर्भाव यामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. उत्पादन घटले तरी मागणी अधिकची असल्याने दर वाढतच आहेत. सध्या कापसाला 9 हजाराचा दर मिळत आहे. पण तेवढ्याच प्रमाणात उत्पादनावर खर्च झाला असल्याने कापसाला 10 ते 11 हजार रुपये दर मिळेपर्यंत विक्रीच करायची नाही अशी भुमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. आर्थिक अडचणीत असलेलाच शेतकरी कापसाची विक्री करीत आहे.

रब्बी हंगामाचीही लगबग

पावसामुळे कापसाची खराबीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. शिवाय पुर्वहंगामातील कापसाचा खराटा झाला आहे. त्यामुळे असा कापूस शेतात ठेऊन शेतजमिनीचे नुकसान टाळण्यासाठी आता कापूस हा वावराबाहेर काढला जात आहे. कापसाचे क्षेत्र हे रिकामे करुन त्या ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली जात आहे. त्यामुळे मशागत करुन शेतजमिन ही तयार केली जात आहे. मात्र, वेचणी झालेला कापूस बाजारात न जाता साठवणूकीच्या ठिकाणी ठेवला जात आहे.

संबंधित बातम्या :

ऊस गाळपासाठी ऑनलाईन अर्ज, मात्र, एफआरपी थकबाकीदारांच्या वाटेला कारवाईचा बडगा

ढगाळ वातावरणाचा ‘या’ तीन मुख्य पिकांना धोका, काय आहे उपाययोजना ?

शेतजमीन विकत घेत आहात का? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी…!

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI