AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSF Recruitment: BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफरची 323 रिक्त पदे! 12 वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

बीएसएफच्या या नोकऱ्यांसाठीचा अर्ज ऑनलाइन माध्यमातूनच असेल. सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांना अर्जासाठी फी म्हणून 200 रुपये भरावे लागतील, तर एससी/एसटी/दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

BSF Recruitment: BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफरची 323 रिक्त पदे! 12 वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
BSF RECRUITMENTImage Credit source: Official Website
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 08, 2022 | 3:33 PM
Share

BSF Head Constable Recruitment: सुरक्षा दल म्हणून देशाची सेवा करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सीमा सुरक्षा दल अशा लोकांना नोकरीची मोठी संधी देत आहे. सीमा सुरक्षा दलाने हेड कॉन्स्टेबल आणि स्टेनोग्राफरच्या 323 पदांसाठी अर्ज मागवले. सीमा सुरक्षा दलात (BSF) हेड कॉन्स्टेबलची (Head Constable) 312 पदे आणि स्टेनोग्राफरची (Stenographer) 11 पदे रिक्त आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या या नोकऱ्यांसाठी आजपासून (8 ऑगस्ट) अर्ज सुरू झाले आहेत. बीएसएफच्या या नोकऱ्यांसाठीचा अर्ज ऑनलाइन माध्यमातूनच असेल. सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांना अर्जासाठी फी म्हणून 200 रुपये भरावे लागतील, तर एससी/एसटी/दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. हे उमेदवार मोफत अर्ज करू शकतात. बीएसएफच्या या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2022 आहे. सीमा सुरक्षा दलाच्या या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी जारी केलेली अधिसूचना वाचा. बीएसएफच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महत्वाच्या तारखा (बीएसएफ भरती 2022 महत्वाच्या तारखा)

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 08/08/2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख– 06/09/2022

बीएसएफ भरती 2022 फीस

सीमा सुरक्षा दलातील रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्याचबरोबर एससी/एसटी/दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्जासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अशा उमेदवारांसाठी अर्ज मोफत आहे.

एकूण पदे (बीएसएफ भरती 2022 एकूण पदे)

बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल आणि स्टेनोग्राफरची एकूण 323 पदे रिक्त आहेत. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हेड कॉन्स्टेबल आणि स्टेनोग्राफरच्या 11 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

पात्रता

सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त बोर्डातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. याशिवाय स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 12वी उत्तीर्ण केलेली असावी आणि याशिवाय स्टेनोग्राफर स्किल टेस्ट पास करावी लागणार आहे.

Follow Us
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती