Career Planning : दहावीनंतर करा हा डिप्लोमा कोर्स, कमी फीसह नोकरीची हमी

डिप्लोमा कोर्सची खास गोष्ट म्हणजे यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच हे अगदी कमी फीमध्ये करता येते. बहुतेक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांची माहिती नसते. (Do this diploma course after 10th, job guarantee with low fee)

Career Planning : दहावीनंतर करा हा डिप्लोमा कोर्स, कमी फीसह नोकरीची हमी
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 7:48 AM

नवी दिल्ली : दहावीपर्यंत जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांच्या मनात हे स्पष्ट होते की त्यांना कोणत्या क्षेत्रात पुढे जायचे आहे. करिअरच्या या नियोजनानुसार बारावीतील विज्ञान, वाणिज्य किंवा कला विषयातील विषयांची निवड केली जाते. आजकाल तरुणांमध्ये जॉब ओरिएंटेड कोर्सची लोकप्रियता खूप वेगाने वाढत आहे. दहावीनंतर असे बरेच कोर्स आहेत जे केल्यानंतर चांगली नोकरी मिळवून भरपूर पैसे कमावता येतात. डिप्लोमा कोर्सची खास गोष्ट म्हणजे यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच हे अगदी कमी फीमध्ये करता येते. बहुतेक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांची माहिती नसते. (Do this diploma course after 10th, job guarantee with low fee)

आर्किटेक्चरमध्ये डिप्लोमा

दहावीनंतर आर्किटेक्चर होण्यासाठी डिप्लोमा इन आर्किटेक्चर कोर्स करता येतो. यामध्ये इमारतीचे बांधकाम, डिझाईन, रचना यावर काम केले जाते. जे विद्यार्थी अत्यंत क्रिएटिव्ह आहेत आणि त्यांना भौतिकशास्त्र आणि गणिताचे ज्ञान आहे ते सहजपणे हा कोर्स करू शकतात. हा कोर्स केल्यावर तुम्हाला दरमहा 30 ते 40 हजार रुपये पगाराच्या रूपात मिळू शकतात. हा कोर्स करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.

अभियांत्रिकी डिप्लोमा

अभियांत्रिकीबाबत विद्यार्थी खूप उत्सुक आहेत. अभियंता बनण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी, चार वर्षांची बीटेक पदवी घेण्याऐवजी केवळ अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा मिळवून नोकरी मिळवू शकतात. अनेक संस्था आणि पॉलिटेक्निक महाविद्यालये अभियांत्रिकी डिप्लोमा उपलब्ध करतात. असे केल्यानंतर तुम्हाला मिडल लेवलवरील नोकर्‍या सहज मिळू शकतात. यात दरमहा किमान 25 ते 30 हजार रुपयांची नोकरी मिळू शकेल. तीन वर्षाचा हा कोर्स करण्यासाठी एक ते चार लाख रुपये खर्च येतो.

पॅरा मेडिकल कोर्स

दहावीनंतर वैद्यकीय क्षेत्रात उत्तम करियर बनवता येते. यात ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, एक्स रे टेक्नॉलॉजी, रेडियोग्राफी आणि मेडिकल इमेजिंग ईसीजी टेक्नॉलॉजी, डायलिसिस टेक्नॉलॉजी, मेडिकल रेकॉर्ड टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये डिप्लोमा कोर्स करता येतात. पॅरा मेडिकलमध्ये डिप्लोमा केल्यावर तुम्हाला लॅब तंत्रज्ञ किंवा सहाय्यक म्हणून नोकरी मिळते. यातून आपण वार्षिक 2 लाख ते 5 लाख मिळवू शकता. हा कोर्स करण्यासाठी एक ते तीन लाख रुपये खर्च येतो.

फाइन आर्ट्समध्ये डिप्लोमा

सुरुवातीपासूनच अ‍ॅनिमेशन, डिझाइनिंग, प्रोग्रामिंग, ग्राफिक्स, व्हिज्युअलायझेशन या क्षेत्रांमध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाइन आर्ट्स अभ्यासक्रम खूप उपयुक्त ठरणार आहे. दहावीनंतर फाइन आर्ट्समध्ये 5 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला दरमहा 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. हे करण्यासाठी 10000 ते 100000 पर्यंत खर्च येऊ शकतो.

स्टेनोग्राफी आणि टायपिंग

दहावीनंतर स्टेनोग्राफी व टायपिंग इन डिप्लोमा केला जाऊ शकतो. कोर्ट आणि इतर अनेक सरकारी कार्यालयांमध्ये यासाठी ऊरती सुरु असते. ज्यासाठी स्टेनो अनिवार्य आहे. स्टेनोग्राफी व्यतिरिक्त, या कोर्समध्ये संगणक आणि टायपिंगशी संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, स्टेनोग्राफीमध्ये आयटीआय देखील केले जाऊ शकते. हा कोर्स एक वर्षाचा आहे. यामध्ये सुरुवातीचा पगार 30 हजार रुपयांपर्यंत आहे. हा कोर्स करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च होऊ शकतो. (Do this diploma course after 10th, job guarantee with low fee)

इतर बातम्या

कोरोनामुक्त होण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टीचा समावेश करा, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

PHOTO | पाहताक्षणी प्रेमात पडला, एकाच भेटीने दोघांचं आयुष्य बदललं, दिग्गज खेळाडूची अनोखी प्रेमकहाणी

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.