
तुम्ही जागतिक बँकेसोबत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी जागतिक बँकेने इंटर्नशिपसाठी जागा काढली आहे. या इंटर्नशिप प्रोग्रॅमअंतर्गत तुम्ही तुमच्या करिअरचा भक्कम पाया घालू शकता.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून उमेदवारांना विकास क्षेत्रात काम करण्याची, नवीन कल्पनांची देवाणघेवाण करण्याची आणि व्यापक संशोधनाचा अनुभव मिळविण्याची संधी मिळते. तुम्हालाही येथे इंटर्नशिप करायची असेल तर तुम्ही 14 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता. तसेच अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या गोष्टी नीट वाचा.
या इंटर्नशिप कार्यक्रमासाठी निवड झालेल्या उमेदवारांना विविध व्यावसायिक आणि तांत्रिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
उमेदवाराकडे बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे किंवा नियमित पदवी कार्यक्रमात प्रवेश घेतलेला असावा.
इंग्रजीवर प्रभुत्व असणे अनिवार्य आहे. याशिवाय फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, अरबी, पोर्तुगीज आणि चिनी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
तांत्रिक कौशल्ये यामध्ये तुम्हाला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
जागतिक बँक आपल्या इंटर्न्सना दर तासाला पैसे देते.
मॅनेजरच्या मर्जीनुसार, 3,000 अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 2,60,590 रुपये) पर्यंतचा प्रवास खर्च दिला जाऊ शकतो, ज्यात ड्युटी स्टेशन शहरात ये-जा करण्यासाठी विमान भाड्याचा समावेश असू शकतो.
इंटर्न्सना स्वत:च राहण्याची व्यवस्था करावी लागेल.
तुम्हालाही येथे इंटर्नशिप करायची असेल तर तुम्ही 14 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता. तसेच अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या गोष्टी नीट वाचा.