Job Alert: सरकारी नोकरीची संधी! १४ हजार जागांसाठी भरती, कसा आणि कुठे करायचा अर्ज?
कर्मचारी निवड आयोगाने एसएससी सीजीएल परीक्षा २०२५ ची अधिसूचना जारी केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने एसएससी सीजीएल परीक्षा २०२५ ची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर एसएससी सीजीएल २०२५ साठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी पात्रता काय आहे? अर्ज कसा करायचा याबाबत माहिती जाणून घेऊयात.
कधीपर्यंत अर्ज करता येणार?
एसएससी सीजीएल २०२५ परीक्षेसाठी इच्छुक उमेदवार ४ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. तर ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०२५ आहे. तसेच अर्जात दुरुस्त्या करण्यासाठी दुरुस्ती विंडो ९ जुलै रोजी सुरु होणार असून ती ११ जुलै २०२५ रोजी बंद होणार आहे. या काळात उमेदवारांना अर्जात दुरुस्ती करता येणार आहे.
किती पदे भरली जाणार?
एसएससी सीजीएल २०२५ या भरतीद्वारे भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संघटना आणि विविध संवैधानिक संस्था/वैधानिक संस्था/न्यायाधिकरणांमध्ये १४५८२ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
कशी असेल निवड प्रक्रिया
एसएससी सीजीएल २०२५ भरतीसाठी टियर I आणि टियर II या दोन स्तरांवर संगणक-आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. टियर I मध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रकार, MCQ प्रश्न असतील. ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये घेतली जाईल. परीक्षेतील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.५० गुण कापले जाणार आहेत.टियर १ परीक्षा १३ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान घेतली जाणार आहे.
एसएससी सीजीएल २०२५ परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
- यानंतर होमपेजवरील “अप्लाय” टॅबवर क्लिक करा.
- SSC CGL 2025 च्या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर, प्रथम स्वतःची नोंदणी करा. त्यानंतर अर्ज भरा.
- अर्ज भरल्यानंतर, उमेदवारांनी तो सबमिट करावा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर, उमेदवारांनी प्रिंटआउट काढावी.