AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAF Agniveervayu Notification 2025: सरकारी नोकरी, अग्निवीर भर्ती 2025 ची अधिसूचना जारी, अशी आहे प्रक्रिया

IAF Agniveervayu Notification 2025: सीबीटी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीद्वारे अग्निवीर पदांसाठी अर्जदारांची निवड केली जाईल. परीक्षा विज्ञान किंवा इतर निवडलेल्या विषयांच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.

IAF Agniveervayu Notification 2025: सरकारी नोकरी, अग्निवीर भर्ती 2025 ची अधिसूचना जारी, अशी आहे प्रक्रिया
| Updated on: Dec 20, 2024 | 1:37 PM
Share

IAF Agniveervayu Notification 2025: देशात बहुचर्चित ठरलेल्या अग्निवीर भरतीचे अधिसूचना (नोटिफिकेशन) निघाली आहे. भारतीय हवाई दलासाठी अग्निवीर भरतीची प्रक्रिया 7 जानेवरी 2025 पासून सुरु होणार आहे. 27 जानेवरी 2025 पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. या भरतासाठी agnipathvayu.cdac.in या वेबसाईटवरुन अर्ज करता येणार आहे. भारतीसाठी पात्रता, शिक्षण आणि शारिरीक क्षमता काय आहे, त्याची माहिती जाणून घेऊ या.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवरी 2005 ते 1 जुलै 2008 दरम्यान झालेला असावा. निवड प्रक्रियेत सर्व चाचण्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचे वय नियुक्तीच्या वेळी 21 वर्षापेक्षा जास्त असू नये.

उंची अशी हवी

  • पुरुष : 152 सेमी
  • महिला : 152 सेमी
  • उत्तराखंडमधील महिला उमेदवार : 147 सेमी
  • लक्षद्वीप : 150 सेमी

वय मर्यादा

  • 17.5 ते 21 वर्ष
  • जन्मतारीख 1 जानेवारी 2005 ते 1 जानेवारी 2008 दरम्यान हवी.
  • वयात सुट इंडियन एअरफोर्समधील अग्निवीर वायु इंटेक 1/2026 मधील नियमानुसार दिली जाईल.

शुल्क:

  • जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस : 550 रुपये
  • एससी/एसटी/पीएच : 100 रुपये

असा असणार पगार :

  • पहिल्या वर्षी : 30,000
  • दुसऱ्या वर्षी : 33,000
  • तिसऱ्या वर्षी : 36,500
  • चौथ्या वर्षी : 40, 000

असा करा अर्ज

  • ऑफिशियल वेबसाइट agnipathvayu.cdac.in वरुन अर्ज करावा
  • न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा
  • नाम, पासवर्डने लॉग इन करा.
  • फॉर्ममध्ये पासपोर्ट साइज फोटो, सिग्नेचर आणि अन्य डॉक्यूमेंट्स अटॅच करा
  • शुल्क भरल्यानंतर फार्म सबमिट करा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकींगने शुल्क भरा.
  • अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

कोण करु शकता अर्ज

विज्ञान शाखेसाठी उमेदवार 50% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्रासह 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने इंग्रजीत 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच 50% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा करणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात. विज्ञान शाखेशिवाय दुसऱ्या कोणत्याही शाखेतून 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहावी.

सीबीटी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीद्वारे अग्निवीर पदांसाठी अर्जदारांची निवड केली जाईल. परीक्षा विज्ञान किंवा इतर निवडलेल्या विषयांच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.