AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IBPS RRB Clerk Result 2021: आयबीपीएस आरआरबी क्लार्क भरती परीक्षेचा निकाल जाहीर, ‘इथे’ पाहा निकाल

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनलने (Institute Of Banking Personnel Selection) आरआरबी लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

IBPS RRB Clerk Result 2021: आयबीपीएस आरआरबी क्लार्क भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथे' पाहा निकाल
IBPS RRB
| Edited By: | Updated on: Sep 05, 2021 | 5:11 PM
Share

IBPS RRB Clerk Result 2021 नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनलने (Institute Of Banking Personnel Selection) आरआरबी लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आयबीपीएस आरआरबी लिपीक प्रिलिम्स परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाईट ibps.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षा दिलेले उमेदवार त्यांचना निकाल वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकतात. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीखेच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल.

IBPS RRB Clerk Result 2021 निकाल कुठं पाहायचा

स्टेप 1 : निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट ibps.inला भेट द्या.

स्टेप 2 : वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3 : आता आपला नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीखच्या सहाय्याने लॉगिन करा.

स्टेप 4 : आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल.

स्टेप 5 : आता निकाल डाऊनलोड करा.

स्टेप 6 : भविष्यातील संदर्भासाठी त्याची एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

5 हजार पदांसाठी भरती

आयबीपीएस आरआरबी लिपीकपदासाठी जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार 5000 पेक्षा अधिक पदांसाठी भरती केली जात आहे. सामान्य भरती प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. या वेळी आयबीपीएस आरआरबी लिपीक परीक्षा 2021 देणाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण चाचणी घेण्यात आली होती. प्रत्येक वर्षी आयबीपीएसद्वारे लिपीक परीक्षा घेतली जाते. निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये किंवा देशातील अनेक सरकारी बँकांमध्ये केली जाते.

मुख्य परीक्षा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनलने आरआरबी लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर केल्या नंतर आता मुख्य परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 190 पदांवर भरती

बँक ऑफ महाराष्ट्र तज्ज्ञ अधिकारीपदासाठी भरती करीत आहे. यामध्ये अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2021 पासून सुरू होत आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) – bankofmaharashtra.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, विशेष अधिकारी पदासाठी या रिक्त जागेत (Bank of Maharashtra Recruitment 2021) एकूण 190 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया 19 सप्टेंबर 2021 पर्यंत चालणार आहे. अर्ज शुल्क जमा करण्याची ही शेवटची तारीख आहे. मात्र, परीक्षा आणि प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या पदांवर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध अधिसूचना तपासणे आवश्यक आहे.

इतर बातम्या:

IBPS Clark 2021 : आयबीपीएस क्लार्क 2021 भरतीसाठी अधिसूचना जारी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा

IBPS RRB Clerk Admit Card 2021: आरआरबी लिपिक परीक्षा प्रवेश पत्र जारी, ‘या’ थेट लिंकवरून करा डाऊनलोड!

IBPS RRB Clerk Result 2021 Declared Know how to Check Office Assistant Result online

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.