आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची शेवटची संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा हक्काची नोकरी

IDBI Bank Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून थेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची शेवटची संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा हक्काची नोकरी
IDBI Bank
| Updated on: Jun 07, 2024 | 12:35 PM

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही शेवटची संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी झटपट या भरतीसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. मग उशीर कशाला करता, लगेचच करा अर्ज. सर्वात विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. थेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

आयडीबीआय बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची संधी आहे. एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी अजून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केली नसतील तर लगेचच अर्ज करावीत. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.

7 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. idbibanki.in.या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागतील. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी वयाची अट ही लागू करण्यात आली असून 20 ते 25 वयोगटातील उमेदवार हे भरतीसाठी अर्ज करू शकतात. 1000 रूपये फीस ही भरतीसाठी उमेदवाराला भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना 200 रूपये फीस भरावी लागेल. 160 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना परीक्षा देखील द्यावी लागेल.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी या भरती प्रक्रियेची अधिसूचना व्यवस्थितपणे वाचून घ्यावी. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधीच म्हणावी लागेल. चला तर मग झटपट भरतीसाठी अर्ज करा. 2 जुलै 2024 रोजी भरती प्रक्रियेसाठी परीक्षेचे आयोजन देखील करण्यात आलंय. ही एकप्रकारची मोठी संधी आहे.