Dangerous Places: इथं गेलेला माणूस परत येण्याची शक्यता नाहीच; जगातील तीन सर्वात घातक ठिकाणं, इथं मनुष्यालाच येण्याची बंदी
Restricted Area: जग फिरण्याची अनेकांना भारी हौस असते. अनेक जण परदेशातील नैसर्गिक ठिकाणी जातात. पण या तीन ठिकाणी जाणं म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण देणं आहे. कोणती आहेत ती तीन ठिकाणं, तुम्हाला माहिती आहेत का?

Restricted Area: जगाला कवेत घेण्याची स्वप्न अनेक जण पाहतात. युट्यूब आणि सोशल मीडियामुळे कमाईचे साधन झाल्याने अनेक जण ट्रॅव्हल व्हॉल तयार करतात. त्यातून कमाई होते आणि अनेक देशात फिरणेही होते. असे अनेक ट्रॅव्हलर्स आपण पाहतो. त्यांच्यामुळे आपल्याला त्या त्या देशाची संस्कृती, भाषा, प्रथा आणि अनेक गोष्टी समजतात. पण जगात अशी काही ठिकाणं आहेत, जिथं जाणं म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखं आहे. कारण इथं गेलेली माणसं परत आली नसल्याचा दावा करण्यात येतो. जी वाचली त्यांचे अनुभव भयावह असल्याचे सांगण्यात येते. कोणता आहेत जगातील ती सर्वात घातक ठिकाणं?
एरिया 51
अमेरिकेतील नेवादा वाळवंट असेच एक खतरनाक ठिकाण आहे. हे अमेरिकन सैन्याचे एक लष्करी तळ आणि प्रशिक्षण केंद्र पण आहे. येथे वायुदलाचा एक छोटे लष्करी विमानतळ आहे. या प्रदेशात अमेरिका नवीन शस्त्र आणि इतर गोष्टींचा प्रयोग करून पाहतो. अनेक लोकांच्या मते हा तोच परिसर आहे. जिथे UFO अनेकदा दिसतात. अमेरिकन लष्कराशी त्यांचा संपर्क असल्याचा दावा अनेक जण करतात. येथे एलियनशी संबंधित काही प्रकल्प गुप्तपणे सुरू असल्याचा सुद्धा दावा करण्यात येतो. अमेरिकेने हे सर्व दावे अनेकदा फेटाळले आहेत. पण या परिसरात कोणत्या नागरिकांना, पर्यटकांना प्रवेश देण्यात येत नाही.
सापांचं बेट
जगातील काही ठिकाणं ही मानवाच्या शक्ती आणि क्षमतेची कसोटी पाहणारी आहेत. त्यातील एक ब्राझीलच्या जंगलातील आहेत. ब्राझीलमध्ये एक सापांचं बेट आहे. कारण या ठिकाणी जगातील सर्वात घातक, विषारी साप राहतात. जर एखादा व्यक्ती चुकून या बेटावर गेला तर तो परत येणे अशक्य मानलं जाते. स्थानिक लोक आणि ब्राझीलच्या वनपरीक्षेत्रातील अधिकारी या जंगलात जाण्यास पर्यटकांना कायम मनाई करतात. त्यातूनही काही साहसी लोक जेव्हा या बेटावर गेले. त्यातील अनेक जण परत आले नसल्याचे सांगण्यात येते. तर जे परत आले, त्यांनी अत्यंत मोठे साप पाहिल्याचा दावा केला आहे.
उत्तर सेंटिनल बेट
नॉर्थ सेंटिनल आयलँड हे भारताच्या अंदमान-निकोबार बेट समूहाचा एक भाग आहे. हा भारताचा केंद्र शासित प्रदेश आहे. येथील स्थानिक लोक अत्यंत आक्रमक आहेत. त्यांचा जगाशी फारसा संपर्क आलेले नाही. ते आजही अश्वयुगात राहिल्या सारखे आहेत. यापूर्वी काही ख्रिश्चन मिशनरी तिथे धर्म प्रसारासाठी पोहचले. पण बेटावर येताच त्यांनी त्यातील अनेकांचा ठार केले. येथील आदिवासी हे बाहेरचा कोणताच पदार्थ, कोणतीच व्यक्ती सहन करत नाहीत. हे आदिवासी आजही अंगाला झाडपाला बांधून राहतात.
