भारतीय हवाई दलात मेगाभरती, 10 वी, 12 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी, कसा कराल अर्ज?

भारतीय हवाई दलाने २०२६ साठी गट 'क' नागरी पदांच्या ४७ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. १०वी आणि १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एलडीसी, टायपिस्ट आणि ड्रायव्हर पदांची ही मोठी संधी असून २ मे पासून ऑफलाइन अर्ज सुरू होणार आहेत.

भारतीय हवाई दलात मेगाभरती, 10 वी, 12 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी, कसा कराल अर्ज?
Indian Air Force Recruitment
| Updated on: Apr 30, 2026 | 1:37 PM

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलाने (IAF) यंदाच्या २०२६ वर्षासाठी गट क (Group C) मधील नागरी पदांच्या भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), हिंदी टायपिस्ट आणि नागरी यांत्रिक वाहतूक चालक यांसारख्या विविध पदांच्या एकूण ४७ जागा भरल्या जाणार आहेत.

भारतीय हवाई दलाच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया येत्या २ मे २०२६ पासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्ज भरून तो संबंधित हवाई दल स्टेशन किंवा युनिटकडे टपालाने पाठवावा लागेल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत (अंदाजे १ जून २०२६ पर्यंत) उमेदवारांचे अर्ज पोहोचणे आवश्यक आहे.

भारतीय हवाई दलाने एकूण ४७ रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. यात कशासाठी किती पद याची माहिती समोर आली आहे.

  • लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC): ३७ पदे
  • हिंदी टायपिस्ट (Hindi Typist): १० पदे
  • नागरी यांत्रिक वाहतूक चालक (OG): ३ पदे

शैक्षणिक पात्रता किती?

यातील LDC आणि हिंदी टायपिस्ट या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. टंकलेखनाचे कौशल्य अनिवार्य असून इंग्रजीसाठी ३५ श.प्र.मि. किंवा हिंदीसाठी ३० श.प्र.मि. गती असणे आवश्यक आहे. तर चालक या पदासाठी १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबतच हलकी व अवजड वाहने चालवण्याचा वैध परवाना आणि किमान २ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

उमेदवारांची निवड प्रामुख्याने लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार टायपिंग टेस्ट किंवा ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागेल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगाच्या स्तर-२ (Level 2) नुसार ₹१९,९०० ते ₹६३,२०० या दरम्यान वेतन आणि इतर शासकीय भत्ते मिळतील.

कसा कराल अर्ज?

  • यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून तो इंग्रजी किंवा हिंदी भाषेत स्पष्ट अक्षरात भरावा.
  • अर्जासोबत स्वतःची स्वाक्षरी असलेली (Self-attested) शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला आणि पासपोर्ट आकाराचा फोटो जोडा.
  • तो संबंधित कमांडिंग ऑफिसरला पोस्टाद्वारे पाठवावा.
  • त्या लिफाफ्यावर कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे.

Follow Us