AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon update : या तारखेला महाराष्ट्रात धो धो पाऊस, मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, अजून 8 दिवस…

Monsoon Rain Update : राज्यात मॉन्सूनचा पाऊस अध्याप दाखल झाला नाही. त्यामध्येच अत्यंत वाईट बातमी मॉन्सूनबाबत पुढे येत आहे. अजून काही दिवस मॉन्सूनच्या पावसाकरिता वाट पाहावी लागणार आहे. 20 जूनला राज्यात मॉन्सून दाखल होणार नाही.

Monsoon update : या तारखेला महाराष्ट्रात धो धो पाऊस, मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, अजून 8 दिवस...
Monsoon Rain
| Updated on: Jun 17, 2026 | 7:12 AM
Share

जूनची 17 तारीख आली. मात्र, मॉन्सून काही राज्यात दाखल झाला नाही. त्यामध्येच आता मॉन्सूनबाबत धोक्याची घंटा पुढे येत आहे. ओडिसा, तेलंगणा, बिहार, झारखंड या भागात मॉन्सून दाखल झाला. पूर्वेकडून येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यामुळे पोषक वातावरण मिळाले. मात्र, अरबी समुद्रात मॉन्सूनची स्थिती जैसे थे आहे. काहीच प्रगती मॉन्सूनची अरबी समुद्रात दिसत नाही. एकाच ठिकाणी मॉन्सून रेंगाळत आहे. 20 जून 2026 रोजी मॉन्सून मुंबईसह राज्यात दाखल होण्याचा अंदाज होता. मात्र, सध्याची मॉन्सूनची स्थिती बघता राज्यात मॉन्सून दाखल होण्याकरिता अजून आठवडाभर वाट पाहावी लागेल. ही अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे. मॉन्सूनची सध्याची स्थिती बघता राज्यात 20 जूनला देखील मॉन्सूनचा पाऊस नसेल. पुढील आठ दिवस म्हणजे जून महिनाही मॉन्सूनशिवाय कोरडा जाण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मॉन्सूनला आग्रेय दिशेने वारा अडथळा निर्माण करत आहे. तरीही मॉन्सून हळूहळू करून पुढे सरकत आहे. मात्र, अरबी समुद्रातून अत्यंत वाईट बातमी येतंय. राज्यात दाखल होणाऱ्या मॉन्सूनही अजिबातच प्रगती नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्याकरिता अजून वाट पाहवी लागणार आहे. हर्णे, सोलापूर, हैद्राबाद, कोरापूट, फलबाणी, रांची, जमुईपर्यंत पुढे मॉन्सून पुढे सरकत आहे.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. पहिल्यांदा सांगण्यात आले की, 15 जून 2026 पर्यंत राज्यात मॉन्सून दाखल होईल. त्यानंतर 20 जूनला मॉन्सूनच्या पावसाचा अंदाज होता. मात्र, आता थेट 8 दिवस महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याचा वेळ लागू शकतो, असा अंदाज आहे. ज्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहेत. शिवाय राज्यातील जवळपास धरणातील पाणीसाठा तळाला गेला. ज्यामुळे पाणीटंचाईचे मोठे संकट उभे आहे.

मॉन्सून रखडलेला आहे. त्यामध्येच राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. पुढील दोन ते तीन दिवसात तापमानात अधिक वाढ होण्याचे संकेत आहेत. पाणीटंचाई आणि वाढती उष्णता ही मोठी समस्या निर्माण झाली. यासोबतच धरणातील पाणीसाठा वाचवण्याकरिता पाणीकपात करण्याचा निर्णय अनेक महापालिकांनी घेतला आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं