AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde Shivsena : जेंझींच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना Action मोडवर, घेतला महत्वाचा निर्णय

Eknath Shinde Shivsena : जंतर मंतर वर नुकतचं एक मोठं विद्यार्थी आंदोलन झालं. मोठ्या संख्येने तरुणाई खासकरुन झेंजी या आंदोलनात उतरले होते. त्यांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

Eknath Shinde Shivsena : जेंझींच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना Action मोडवर, घेतला महत्वाचा निर्णय
Eknath Shinde
| Updated on: Aug 03, 2026 | 9:39 AM
Share

जंतर मंतर वरील जेंझींच्या आंदोलनानंतर राज्यातील शिवसेना Action मोडवर आली आहे. 2029 रोजी देशात 38 कोटी तरूण हे झेंजी मतदार असतील. त्यासाठी शिवसेनेने खास मास्टर प्लान आखला आहे. शिवसेनेने लवकरच यासाठी ऐक बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आहे. जेंझी तरूण मतदारांचे नेतृत्व करण्यासाठी शिवसेनेकडून योग्य चेहऱ्याची निवड करण्यात येणार आहे. यासाठी पक्षातील नेत्यांच्या तरुण मुलांना आणि विविध सामाजिक संघटनेत तरुणांचं नेतृत्व करणाऱ्या युवा चेहऱ्यांवर शिवसेना काम करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शहरात आणि गावात असलेल्या या तरुण मतदारांसाठी एका मेळाव्याचे आयोजन करण्यावर पक्षांतर्गत विचार सुरू आहे. तरुणांच्या प्रश्नांवर आत्तापासून काम करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील सर्व पदाधिकारी आणि नेत्यांना सूचना दिली आहे.

जंतर मंतर वर नुकतचं एक मोठं विद्यार्थी आंदोलन झालं. मोठ्या संख्येने तरुणाई खासकरुन झेंजी या आंदोलनात उतरले होते. त्यांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच एवढं मोठं आंदोलन झालं. भारतात युवकांची संख्या मोठी आहे. पुढच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये झेंजीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्ताच खबरदारी घेत पावलं उचलली आहेत.

हे मोठं आंदोलन उभं राहिलं

2029 मध्ये देशात लोकसभेच्या आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत. अशावेळी झेंजी मतदार ज्याच्यासोबत त्याचा फायदा जास्त होऊ शकतो. म्हणून भाजप-शिवसेनेने आत्तापासूनच रणनिती आखून काम करायला सुरुवात केली आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्स्टाग्रामवरुन सतत युवा मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. नीट पेपर फुटीमुळे देशात हे मोठं आंदोलन उभं राहिलं. पुन्हा असे प्रकार घडू नयेत, यासाठी केंद्र सरकारने संसदेत परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर केलं.

आंदोलनाला हिंसक वळण लागलं

20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मार्च काढला होता. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर देशात या विद्यार्थी आंदोलनाबद्दल मोठी चर्चा सुरु झाली. अनेक सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले