AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thalapathy Vijay : थलपती विजयच्या लेकाने वाढवलं होतं कुटुंबाचं टेन्शन, थेट पोलिसांत जाण्याची आली होती वेळ

थलपथी विजय यांचा मुलगा, दिग्दर्शक जेसन संजय लवकरच 'सिग्मा' चित्रपटातून पदार्पण करत आहे. एका खास मुलाखतीत त्याने कुटुंब, बहीण दिव्या साशाशी असलेले घट्ट नाते आणि आईबद्दल मजेशीर किस्से सांगितले. वडील मुख्यमंत्री झाल्यावर वाढलेली जबाबदारी, कौटुंबिक प्रतिष्ठा जपत दिग्दर्शकीय प्रवासाचे अनुभव त्याने मोकळेपणाने मांडले.

Thalapathy Vijay : थलपती विजयच्या लेकाने वाढवलं होतं कुटुंबाचं टेन्शन, थेट पोलिसांत जाण्याची आली होती वेळ
थलपती विजय यांच्या लेकाचा मोठा खुलासा
| Updated on: Aug 03, 2026 | 9:51 AM
Share

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांचा मुलगा, दिग्दर्शक जेसन संजय हा बराच चर्चेत आहे. त्याने दिग्दर्शित केलेला ‘सिग्मा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्यामुळे चाहत्यांची, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कुटुंबांपैकी एका कुटुंबात वाढताना आलेल्या अनुभवांबद्दल जेसनने मोकळेपणाने सांगितले. एवढंच नव्हे तर त्याने त्याच्या आईबद्दल मोठा खुलास केला, तसेच आपल्या बहिणीसोबतच्या नात्याबद्दल आणि कुटुंबाचे नाव व प्रतिष्ठा जपण्याची सतत जाणवणारी जबाबदारी याबद्दलही मनमोकळेपणाने भाष्य केलं. आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या ‘सिग्मा’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी ‘बिहाइंडवुड्स टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत 25 वर्षीय जेसन याने आपली बहीण दिव्या साशाबद्दलही सांगितले. “आम्ही दोघं खूप जवळचे आहोत. माझ्या कुटुंबात मी माझ्या बहिणीच्या सर्वाधिक जवळ आहे. आम्ही दररोज बोलतो. एकाच घरात राहणं थांबल्यापासून आमचं नातं आणखी घट्ट झालं आहे.” असं त्याने नमूद केलं.

बहिणीसोबतचं जेसन संजय यांचं नातं

जेसन याच्या सांगण्यानुसार, उच्च शिक्षणासाठी दोघेही घराबाहेर गेल्यानंतर त्यांचं नातं अधिक दृढ झालं. जेसन फिल्ममेकिंगचं शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेला होता. दूर असूनही ते दोघे नियमित व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात असतात. “तिलाही सिनेमाची खूप आवड आहे. ती आपलं मत अगदी स्पष्टपणे मांडते” असं त्याने सांगितलं. तसेच ‘सिग्मा’ची कथा सर्वप्रथम माझ्या बहिणीनेच ऐकली होती आणि स्क्रिप्टबाबत तिच्या प्रामाणिक अभिप्रायामुळे चित्रपटाला अंतिम स्वरूप देण्यास मोठी मदत झाली. असंही त्याने नमूद केलं.

वडील मुख्यमंत्री झाल्यानंतर जबाबदारी वाढली

या घट्ट नात्यासोबतच जबाबदारीची जाणीवही वाढली असल्याचे जेसनने सांगितलं. वडील, अभिनेता थलपती विजय हे, मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या कुटुंबाकडे लोकांचे अधिक लक्ष वेधले जाऊ लागलं आहे. त्यामुळे बहिणीची काळजी घेण्याची जबाबदारी नेहमीच आपल्यावर असल्याचे तो म्हणाला. “एका टप्प्यानंतर मला तिची काळजी घ्यावीच लागते. प्रत्येक वेळी तिचं संरक्षण करावं लागतं आणि तिला योग्य मार्गदर्शन करावं लागतं. एवढ्या कमी वयात ही खूप मोठी जबाबदारी आहे” असं त्याने सांगितलं.

आई खूप कडक आहे

कुटुंबाबद्दल बोलतनाच जेसन याने आई संगीतबद्दलही मोठा खुलासा केला. आपली आई, संगीत हिच्या कुटुंबावर लक्ष ठेवण्याच्या सवयीबद्दल एक मजेशीर किस्सा त्याने सांगितला. “माझी आई एखाद्या गुप्तहेरासारखी आहे. मी कधी लपूनछपून बाहेर फिरायला गेलो, तरी ती मला पकडतेच” असं त्याने हसत सांगितलं.

जेसनसाठी पोलिसांत तक्रार करण्याची आली होती वेळ

यानंतर त्याने आणखी एक मोठा किस्सा सांगितलवा. एकदा असं काही घडलं की कुटुंबाला थेट पोलिसात जायची वेळ आली असती, असं तो म्हणाला. एक अशी घटना सांगितली, ज्यामुळे तो हरवल्याची पोलिसांत तक्रार करण्याची वेळ जवळपास आली होती. “एकदा रात्री घरातील सगळेजण झोपले असताना मी कोणालाही न सांगता गाडी घेऊन बाहेर पडलो आणि सकाळी परतलो. माझा मोबाईलही बंद होता. माझे कुटुंबीय माझ्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवणार होतं. मी सकाळी घरी परतल्यावर घरात मोठा गोंधळ झाला” असा किस्सा त्याने सांगितलं.

‘सिग्मा’ची रिलीज पुढे ढकलली

जेसन संजय हा दिग्दर्शनात पदार्पण करत असून त्याच्या ‘सिग्मा’ या चित्रपटात संदीप किशन मुख्य भूमिकेत आहेत आणि या चित्रपटाची निर्मिती लाइका प्रोडक्शन्सने केली आहे. अनेक वर्षांपासून निर्मितीमध्ये असलेला हा चित्रपट यापूर्वी जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, जेसन यांच्या वडिलांचा ‘जन नायकन’ हा शेवटचा चित्रपट त्याच काळात प्रदर्शित होणार असल्याने त्याने चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ