AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे अत्यंत घृणास्पद, वाईट..; ‘टॉक्सिक’मधील इंटिमेट सीन्सबद्दल हुमा कुरेशी स्पष्टच बोलली..

'टॉक्सिक' या चित्रपटातील 'तबाही' या गाण्यातील इंटिमेट सीन्सवरून अभिनेत्री कियारा अडवाणीवर टीका करण्यात आली. याप्रकरणी आता अभिनेत्री हुमा कुरेशीने प्रतिक्रिया दिली आहे. ती नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

हे अत्यंत घृणास्पद, वाईट..; 'टॉक्सिक'मधील इंटिमेट सीन्सबद्दल हुमा कुरेशी स्पष्टच बोलली..
हुमा कुरेशी, कियारा अडवाणीImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 03, 2026 | 9:47 AM
Share

‘केजीएफ’ स्टार यशचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘टॉक्सिक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील ‘तबाही’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं होतं. या गाण्यात कियारा अडवाणी आणि यश यांच्या इंटिमेट सीन्सचा भरणा होता. यावरून नेटकऱ्यांनी कियाराला प्रचंड ट्रोल केलं. विवाहित स्त्री आणि एक आई असूनही तिने अशा प्रकारचा चित्रपट किंवा सीन्स का निवडले, असा प्रश्न टीकाकारांनी उपस्थित केला होता. तर दुसरीकडे यशसुद्धा विवाहित असून त्याला इंटिमेट सीन्ससाठी खूपच कमी टीकेला सामोरं जावं लागलं. यावर आता अभिनेत्री हुमा कुरेशीने रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

युवाच्या ‘बी अ मॅन, यार’ या शोमध्ये निखिल तनेजाने सांगितलं की, ‘तबाही’ गाण्यातील इंटिमेट सीन्ससाठी यशपेक्षा जास्त कियाराला टीकेचा सामना करावा लागला. दोघंही विवाहित असले तरी कियारावर नेटकऱ्यांनी अधिक निशाणा साधला. यावर हुमा म्हणाली, “हे खूपच चुकीचं आणि घृणास्पद आहे. पण मला वाटतं की या चित्रपटात सहभागी असलेल्या अभिनेत्री आणि दिग्दर्शिकांचाच अंतिम विजय होईल. कोणत्याही गोष्टीचा बचाव करण्यात काही अर्थ नाही. कारण तुम्ही फक्त शब्दांनी लोकांचे विचार बदलू शकत नाही. त्यापेक्षा हा चित्रपट स्वत:च बोलणार.”

यशच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटातील ‘तबाही’ हे पहिलं गाणं प्रदर्शित झाल्यापासून कियारा अडवाणीला तिच्या इंटिमेट सीन्समुळे मोठ्या प्रमाणात टीका आणि वाईट कमेंट्सचा सामना करावा लागत आहे. ही टीका फक्त कियारापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तर ट्रोलर्सनी तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रालाही लक्ष्य केलं. त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर नेटकऱ्यांनी तशाच प्रकारच्या कमेंट्स केल्या.

‘टॉक्सिक’मध्ये काम करत असलेल्या ब्रिटिश अभिनेता बेनेडिक्ट गॅरेटनेही याआधी कियाराची बाजू मांडली होती. तो म्हणाला होता, “हे पहा.. यशसुद्धा विवाहित आहे आणि त्यालासुद्धा मुलं आहेत. मग फक्त स्त्रीवरच टीका का होत आहे? दोघंही कलाकार आहेत आणि अभिनय करणं हे त्यांचं काम आहे. मानवी अनुभवाचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या कथा सांगणं हे त्यांचं काम आहे. हा वाद त्या दोन कलाकारांबद्दल कमी आणि समाजाबद्दल अधिक सांगतो.” या वादावर अद्याप कियारा किंवा यशने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

Follow Us
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी