AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Water Supply : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची अपडेट समोर

Mumbai water supply : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. महापालिका लवकरच पाणीकपात रद्द करण्याची शक्यता आहे.

Mumbai Water Supply : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची अपडेट समोर
mumbai water stock
| Updated on: Aug 03, 2026 | 9:36 AM
Share

राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे जलाशयांमधील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. मुंबईल पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे पालिका मुंबईतील पाणीकपात मागे घेण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबई महापालिका लवकरच निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.

दहा टक्के पाणी कपात मागे घेण्याची शक्यता 

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तलावांमधील एकूण पाणीसाठा सुमारे ९० टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता लवकरच लागू असलेली १० टक्के पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय महापालिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सात जलाशयातील पाणीसाठा 89 टक्क्यांवर 

सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आवश्यक क्षमतेच्या जवळपास ८९ टक्के पाणीसाठा जमा झालाय. यामध्ये मोडक सागर आणि विहार तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. तर तानसा आणि तुळशी तलावही जवळपास तुडुंब भरले आहेत. मुंबईला दररोज सुमारे ४,१०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी या सात प्रमुख जलाशयातून पुरविले जाते. उन्हाळ्यात महापालिकेने पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी काही काळापूर्वी १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांतील जोरदार पावसामुळे दररोजच्या पाणीपुरवठ्यात वाढ देखील करण्यात आली आहे. सात जलाशयांत पाणीसाठा वाढल्याने कपात रद्द होण्याची शक्यता आहे. सध्याचा पाणीसाठा आणि आगामी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून पाणीकपातीचा आढावा घेतला जात आहे. सातही जलाशयातील पाणीसाठा पाहता लवकरत पालिकेकडून पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली जाऊ शकते.  पाणीकपात रद्द केल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले