AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Jobs : ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन, 10 वी पास उमेदवारांना उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिसची संधी

भारतीय रेल्वे अप्रेंटिस करण्याची इच्छा असणाऱ्या दहावी पास उमेदवारांना चांगली संधी आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वेनं यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केलं आहे. उत्तरमध्य रेल्वेमध्ये 1664 पदांवर अप्रेंटिससाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

Railway Jobs : ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन, 10 वी पास उमेदवारांना उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिसची संधी
प्रातिनिधीक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 3:43 PM
Share

नवी दिल्ली: भारतीय रेल्वे अप्रेंटिस करण्याची इच्छा असणाऱ्या दहावी पास उमेदवारांना चांगली संधी आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वेनं यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केलं आहे. उत्तरमध्य रेल्वेमध्ये 1664 पदांवर अप्रेंटिससाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमदेवार नॉर्थ सेंट्रल रेल्वेच्या वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. 2 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहेत. उत्तर मध्य रेल्वेच्या rrcpryj.org या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येतील.

अप्रेंटिस भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस कायदा 1961अंतर्गत भारतीय रेल्वेच्या विविध विभागात, कार्यशाळा आणि एनसीआर न्यायक्षेत्रातील म्हणजेच प्रयागराज, आग्रा, झांशी वर्कशॉपमध्ये अप्रेंटिस करता येणार आहे.

पात्रता

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण आवश्यक असून त्याशिवाय संबंधित ट्रेड मधील आयटीआय सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. वेल्डर, वायरमन, कारपेंटर या अभ्यासक्रमातील आयटीआय उत्तीर्ण आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमीत कमी वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्‍यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथील केलेली आहे. फ्रेशर्स, आयटीआय आणि लॅब टेक्निशियन यांच्यासाठी वयाची अट 22 वर्ष आहे. तर आरक्षणानुसार उमदेवारांना 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत वयोमर्यादेतून सूट दिली जाईल.

उमेदवारांची निवड कशा प्रकारे होईल?

उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करुन करण्यात येणार आहे. उमेदवारांना दहावीला मिळालेले गुण आणि आयटीआय मध्ये मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

अर्ज कसा करायचा?

स्टेप 1: नॉर्थ सेंट्रल रेल्वेच्या वेबसाईटला भेट द्या

स्टेप 2: होमपेजवरील अप्रेंटिस भरती 2021 लिकंवर क्लिक करा

स्टेप 3 : मोबाईल नंबर आणि ईमेल द्वारे लॉगीन करा

स्टेप 4 : लॉगीन केल्यानंतर सर्व आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा

स्टेप 5 : अर्ज दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा

अर्जाचे शुल्क

खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. तर, एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही.

इतर बातम्या:

Weather Forecast : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा ते विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अ‌ॅलर्ट जारी

कोलकात्याचा पराभवाबरोबर धुरंदर खेळाडूच्या करिअरला ब्रेक?, पुन्हा खेळण्यावरही प्रश्नचिन्ह!

Indian Railway Recruitment 2021 North Central Railway invited applications for 1664 Apprentice posts at rrcpryj org

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.