MPSC : MPSC: नोकरभरतीवरली निर्बंध उठवले! कोणकोणत्या विभागांना नोकरभरतीसाठी मान्यता? जाणून घ्या

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनावरील तसंच निवृत्ती वेतनावरील वाढता खर्च लक्षात घेता, राज्य सरकारने रिक्त पदभरती आणि नवीन नोकर भरतीसाठीची वाटचाल संथगतीने सुरु ठेवली होती.

MPSC : MPSC: नोकरभरतीवरली निर्बंध उठवले! कोणकोणत्या विभागांना नोकरभरतीसाठी मान्यता? जाणून घ्या
राज्यसेवा मुख्य परिक्षा 2020 ची गुणवत्ता यादी जाहिर
Image Credit source: Facebook
| Updated on: Apr 13, 2022 | 2:18 PM

मुंबई : राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनावरील (Salary) तसंच निवृत्ती (Retirement) वेतनावरील वाढता खर्च लक्षात घेता, राज्य सरकारने (State Government) रिक्त पदभरती आणि नवीन नोकर भरतीसाठीची वाटचाल संथगतीने सुरु ठेवली होती.
राज्य शासनाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या विभागांनी सुधारित आकृतिबंध तयार करायला सुरुवात केली. आकृतिबंध तयार नसल्यास रिक्त पदं भरण्यास किंवा नवीन पदनिर्मितीसाठी मान्यता देता येणार नाही असं राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. आकृतिबंध तयार करायला सुरुवात केली गेली आणि २०२० मध्ये कोरोनाचं संकट ओढवलं.

लॉकडाऊनच्या काळात सगळ्या नोकरभरतीवर निर्बंध

लॉकडाऊनचा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसला. परिणामी आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, औषध विभाग असे आरोग्यविषयक विभाग सोडले तर राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळात सगळ्या नोकरभरतीवर निर्बंध लागू केले.

त्याच विभागांना नोकरभरतीसाठी मान्यता

आता या इतर नोकरभरतीवरील निर्बंध उठवण्यात आलेले आहेत परंतु, ज्या विभागांच्या सुधारित आकृतिबंधास अंतिम मंजुरी देण्यात आलीये त्याच विभागांना नोकरभरतीसाठी मान्यता आहे. याचप्रमाणे सुधारित आकृतिबंध मंजूर करून घेतलेल्या विभागांना लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के आणि आयोगाच्या कक्षेबाहेरील ५० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

इतर बातम्या :

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर टीका केली की प्रसिद्धी मिळते, अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर टीका

राज यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र, ते कोणाची ‘बी’ टीम म्हणून काम करणार नाहीत; चंद्रकांत पाटलांकडून पाठराखण

10 हजारांच्या रेंजमधला Vivo स्मार्टफोन आणखी स्वस्त, कंपनीकडून किंमतीत कपात