AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र, ते कोणाची ‘बी’ टीम म्हणून काम करणार नाहीत; चंद्रकांत पाटलांकडून पाठराखण

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनसेला इको सिस्टीमने भाजपची 'बी' टीम ठरवण्याचा प्रयत्न झाला. जितेंद्र आव्हाड, अजितदादा नंतर आता आदित्य ठाकरे यात सामील झालेत. मात्र, राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे. ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत.

राज यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र, ते कोणाची 'बी' टीम म्हणून काम करणार नाहीत; चंद्रकांत पाटलांकडून पाठराखण
चंद्रकांत पाटील Image Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Apr 13, 2022 | 12:29 PM
Share

कोल्हापूरः राज यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे. ते कोणाची ‘बी’ टीम म्हणून काम करणारे नाहीत, अशी पाठराखण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी करत राज यांचा बुधवारी कैवार घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवतीर्थावरील सभेनंतर काल ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत अनेकांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरून अनेकांनी त्यांच्यावर पलटवार केला. संजय राऊत यांनी आज सकाळीच मुंबईत एक जळजळीत पत्रकार परिषद घेऊन राज कोणाचा भोंगा वाजवतायत हे कळून चुकल्याचे सांगितले. त्यानंतर आता राज यांना भाजपकडून जोरदार बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.

जनाब म्हणूनही सरकारमध्येच…

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनसेला इको सिस्टीमने भाजपची ‘बी’ टीम ठरवण्याचा प्रयत्न झाला. जितेंद्र आव्हाड, अजितदादा नंतर आता आदित्य ठाकरे यात सामील झालेत. मात्र, राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे. ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंना कोणी जनाब म्हणते आहे, असे असताना सुद्धा तुम्ही सरकार मध्येच आहेत.

आता मशिद पाडल्याचे श्रेय…

चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदुत्व हा भाजपचा श्वास आहे. अलीकडे काहीजण अयोध्या मशिद पडल्याचे श्रेय घेत आहेत. आज हिंदुत्वाचा जो मुदा राज ठाकरे मांडत आहेत, तो आम्ही आदीपासून मांडला आहे. मेहबुबा मुफ्ती ना एका लाइनवरून आणण्यासाठी भाजप सोबत गेली, पण त्या योग्य लाइनवर येत नाहीत असे दिसल्यावर भाजप बाहेर पडली.

सत्तेचा दुरुपयोग सुरू…

राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या सभेदरम्यान तलवार दाखवली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. याबद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सरकार गुन्हा दाखल करण्याची एक ही संधी सोडत नाही, पण न्यायालयात गेल्यावर ते तोंडावर पडतात. सत्तेत असल्याचा दुरुपयोग करून हे सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.