AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JKSSB Jobs: जम्मू-काश्मीर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डमध्ये पदांची भरती! सरकारी नोकरी

जेकेएसएसबीने जाहीर केलेल्या या रिक्त जागेच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरच्या विविध विभागांमध्ये भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी वेबसाइट- jkssb.nic.in जा.

JKSSB Jobs: जम्मू-काश्मीर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डमध्ये पदांची भरती! सरकारी नोकरी
JKSSB JobsImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 16, 2022 | 4:36 PM
Share

जम्मू-काश्मीर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डा (Jammu Kashmir Service Selection Board) कडून नागरी सेवेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या रिक्त पदांच्या माध्यमातून एकूण 772 पदांची भरती करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी नोकऱ्या (Government Jobs) हव्या असलेल्या तरुणांना मोठी संधी आहे. ज्या उमेदवारांना या व्हेकन्सीसाठी अर्ज करायचा आहे, ते अधिकृत संकेतस्थळ – jkssb.nic.in भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. जम्मू-काश्मीर नागरी सेवा पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, वेबसाइटवर (Official Website) उपलब्ध असलेली अधिसूचना तपासा. जम्मू-काश्मीर नागरी सेवा पदांसाठी या रिक्त जागेसाठी अर्ज प्रक्रिया 14 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 14 सप्टेंबर 2022 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी या स्टेप्स

  1. स्टेप 1: अर्ज करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट – jkssb.nic.in वर जा.
  2. स्टेप 2: वेबसाइटच्या होम पेजवर दिलेल्या नोटिफिकेशन्स पर्यायावर जा.
  3. स्टेप 3: यानंतर, जिल्हा, संवर्ग आणि इतर पदांसाठी जारी करण्यात आलेल्या जेकेएसएसबी भरती 2022 च्या अधिसूचनेच्या लिंकवर जा.
  4. स्टेप 4: अप्लाय ऑनलाइन लिंकवर क्लिक करा.
  5. स्टेप 5: पुढील पानावर मागितलेला तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  6. स्टेप 6: रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.
  7. स्टेप 7: ॲप्लिकेशन पूर्ण झाल्यानंतर प्रिंट घ्या.

शुल्क

या रिक्त जागेवर अर्ज शुल्क जमा झाल्यानंतरच अर्ज प्रक्रिया पूर्ण मानली जाणार आहे. यामध्ये दोन टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्कापोटी 550 रुपये भरावे लागणार आहेत. याशिवाय एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी 400 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. करिअरच्या बातम्या इथे पाहा.

व्हेकन्सी डिटेल्स

या रिक्त जागेच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरच्या विविध सरकारी विभागांमध्ये भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विभागांची माहिती पाहूनच अर्ज भरावा-

  • कृषी उत्पादन आणि शेतकरी कल्याण – 30 पदे
  • पशु/मेंढी पालन और मत्स्य विभाग- 126 पद
  • सिविल एविएशन विभाग- 02 पद
  • विधी व न्याय विभाग – 2 पदे
  • इस्टेट विभाग – 5 पद
  • वन विभाग – 523 पद
  • सामान्य प्रशासन विभाग – 28 पद
  • मेडिकल एजुकेशन- 04 पद
  • गृह विभाग- 23 पद
  • प्रोटोकॉल विभाग- 1 पद
  • पर्यटन – 10 पद
  • परिवहन विभाग – 17 पद
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?