Job Search : गण्या, बबन्या रिकामे बसू नका, लगेच अर्ज करा, बँक ॲाफ महाराष्ट्रात मोठी भरती, पगाराचा आकडा पाहून…

Bank of Maharashtra : बँक ॲाफ महाराष्ट्रमध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत. कोणत्या पदासाठी आणि किती असेल पगार ? सर्व माहिती इथे सविस्त वाचायला मिळेल.

Job Search : गण्या, बबन्या रिकामे बसू नका, लगेच अर्ज करा, बँक ॲाफ महाराष्ट्रात मोठी भरती, पगाराचा आकडा पाहून…
बँक ॲाफ महाराष्ट्रात मोठी भरती
Image Credit source: social media
| Updated on: Sep 11, 2025 | 1:51 PM

Bank of Maharashtra Generalist Officers Recruitment 2025 : तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. कारण बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank of Maharashtra) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. बँकेने ऑफिसर स्केल II ते स्केल VI (Generalist Officer) पर्यंतच्या 350 पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते. यासाठीची अर्ज प्रक्रिया कालपासून, म्हणजेच 10 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
ज्यांना या पदासाठी अर्ज करायचे असतील ते इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

कोण करू शकतं अप्लाय ?

या पदांच्या भरतींसाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, बीई (अभियांत्रिकी पदवी), बीटेक (तंत्रज्ञान पदवी), एमएससी (मास्टर ऑफ सायन्स) किंवा एमसीए (मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स) सारखी पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 25 वर्षे आणि कमाल वय 50 वर्षे असावे, मात्र सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गांना वयात सूट दिली जाईल.

कसं कराल अप्लाय ?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट द्यावी लागेल. तेथे, होमपेजवरील Click here for New Registration लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करावी लागेल. यानंतर, तुम्हाला नाव, ईमेल आणि मोबाईल नंबर यासारखी आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागेल. त्यानंतर तुमचा फोटो आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावा. अर्ज शुल्क भरल्यानंतर, फॉर्म सबमिट करावा लागेल. शेवटी, अर्जाची प्रिंटआउट काढून भविष्यातील संदर्भासाठी ती सुरक्षित ठेवावी. इथे अर्ज करताना ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी 1180 रुपये आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी 118 रुपये असे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग सारख्या ऑनलाइन पद्धतीने हे शुल्क तुम्ही भरू शकता.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये निघालेल्या या पदांवर निवड होण्यासाठी, उमेदवारांना प्रथम ऑनलाइन लेखी परीक्षा द्यावी लागेल आणि त्यात यशस्वी होणाऱ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार उमेदवाांची अंतिम निवड केली जाईल.

पगार किती ?

या पदांसाठी ज्यांची निवड होईल त्या उमेदवारांना आकर्षक पगार पॅकेज मिळेल जे स्केलनुसार बदलू शकेल. स्केल VI साठी दरमहा 1,40,500 ते 1, 56, 500 रुपये, स्केल V साठी 1,20,940 ते 1,35,020 रुपये, स्केल IV साठी 1,02,300 ते 1,20,93 रुपये, स्केल III साठी 85,920 ते,05,280 रुपये आणि स्केल II साठी 64,820 ते93,960 रुपये दरमहा वेतन असेल.

इथे पहा नोटिफिकेशन

30 सप्टेंबरपूर्वी करा अर्ज

मात्र या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा. तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र आणि छायाचित्र यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत. 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे वेळेत अर्ज करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.