Jobs : एक नौकरी की कीमत सब जाने है रमेश बाबू ! 150 रिक्त जागा आहेत, एक नोकरी मिळूच शकते, अर्ज करा…

| Updated on: Apr 24, 2022 | 11:23 AM

सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) कडून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. 150 रिक्त पदांसाठी ही भरती सुरु करण्यात आलीये. या पदांसाठीचा ऑनलाईन अर्ज उमेदवारांना उद्यापासून, 25 एप्रिल 2022 पासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे

Jobs : एक नौकरी की कीमत सब जाने है रमेश बाबू ! 150 रिक्त जागा आहेत, एक नोकरी मिळूच शकते, अर्ज करा...
150 रिक्त जागा आहेत
Image Credit source: facebook
Follow us on

एका नोकरीची किंमत सगळ्यांनाच माहित आहे. बेरोजगारी वाढलीये सहसा नोकऱ्या मिळत नाहीत. इंजिनिअर (Engineer) असाल आणि GATE दिली असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी (Opportunity) आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) कडून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. 150 रिक्त पदांसाठी ही भरती सुरु करण्यात आलीये. या पदांसाठीचा ऑनलाईन अर्ज उमेदवारांना उद्यापासून, 25 एप्रिल 2022 पासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे आणि या अर्जाची शेवटची मुदत 24 मे 2022 आहे. असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि असिस्टंट डाटा अनॅलिस्ट या पदांसाठीच्या या जागा आहेत. GATE 2022 हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून पात्र असल्यास अर्ज भरावा.

पदाचे नाव आणि पदांनुसार उपलब्ध जागा

एकूण जागा – १५०

असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनिअर (ASE) – 144

असिस्टंट डाटा अनॅलिस्ट (ADA) –  06

शैक्षणिक पात्रता

1] असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनिअर (ASE) – 1) B.E / B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर अप्लिकेशन / कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी / IT ) किंवा MCA / B.Sc ( कॉम्प्युटर सायन्स ) किंवा M.E / M.Tech ( कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ) 2) GATE २०२२

2] असिस्टंट डाटा अनॅलिस्ट ( ADA ) – 1) कोणत्याही विषयात B.E / B.Tech / M.E / M.Tech / किंवा M.Sc (गणित / सांख्यिकी / ऑपरेशन्स रिसर्च / MA (अर्थशास्त्र) किंवा MCA / B.Sc (कॉम्प्युटर सायन्स ) 2) GATE २०२२

वयाची अट

24 मे 2022 रोजी 22 ते 27 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

वेतन

60,000/-

अर्ज शुल्क

General / OBC – 1000/-

[ SC/ ST/ PWD / महिला – फी नाही ]

इतर माहिती

नोकरीचं ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्जाची शेवटची मुदत – 24 मे 2022

महत्त्वाचे

अधिकृत वेबसाईट – Click Here

PDF – Click Here 

ऑनलाईन अर्ज करा – Click Here 

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

इतर बातम्या :

Kirit Somaiya: सोमय्यावरील हल्ल्याची थेट केंद्रीय गृहसचिव चौकशी करणार?; सोमय्या नेमकं काय म्हणाले?

माझ्या नावाने फेक एफआयआर बनवली, सोमय्यांनी सांगितलेल्या एफआयआरमध्ये नेमकं काय?

Raosaheb Danve : महाराष्ट्रात आणीबाणी सदृश परिस्थिती, केंद्रीय मंत्री दानवेंचं मोठं विधान; भाजपच्या मनात नेमकं काय?