Kokan Railway Recruitment 2021: ना परीक्षा ना मुलाखत, थेट निवड; कोकण रेल्वेत 139 जागांवर अप्रेटिंसची संधी

कोकण रेल्वेमध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल आणि सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या पदांसाठी अप्रेंटिस करण्याची संधी आहे.

Kokan Railway Recruitment 2021: ना परीक्षा ना मुलाखत, थेट निवड; कोकण रेल्वेत 139 जागांवर अप्रेटिंसची संधी
रेल्वे


Railway Recruitment 2021 मुंबई : कोकण रेल्वेमध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल आणि सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या पदांसाठी अप्रेंटिस करण्याची संधी आहे. रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना कोकण रेल्वेमध्ये 139 पदांवर अप्रेंटिस करता येणार आहे.

अर्ज दाखल करण्याची मुदत?

कोकण रेल्वेत अप्रेंटिससाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 22 नोव्हेंबर आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कोकण रेल्वेत अप्रेंटिस करण्याची संधी दिली जाईल. अप्रेंटिस भरती प्रक्रिया आणि इतर अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन वाचणे आवश्यक आहे. पात्र उमेदवार https://krap.konkanrailway.com/nats/ या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

कोकण रेल्वेतील अप्रेंटिस साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर, टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी डिप्लोमा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

अर्जाचं शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर, इतर प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी कोणताही शुल्क आकारलं जाणार नाही. गुणवत्ता यादी च्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल, असं कळवण्यात आलंय.

उमेदवारांची निवड कशा प्रकारे होईल?

उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करुन करण्यात येणार आहे. उमेदवारांना पात्रता परीक्षेतील मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात अप्रेंटिस करावी लागेल.

इतर बातम्या:

Railway Recruitment 2021: ना परीक्षा ना मुलाखत, थेट दहावीच्या गुणांवर निवड, रेल्वेत 1785 जागांवर अप्रेटिंसची संधी

Railway Jobs : ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन, 10 वी पास उमेदवारांना उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिसची संधी

Kokan Railway Recruitment for Apprentice for 139 post check details here

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI