MPSC Recruitment 2022: मित्रो, सरकारी नोकरी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुवर्णसंधी, इच्छुक उमेदवार त्वरा करा

MPSC Recruitment 2022: भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीच्या आधारे होईल, अर्जदारांची निवड केली जाईल आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. जर इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असेल तर शॉर्टलिस्टसाठी स्क्रीनिंग टेस्ट देखील असू शकते.

MPSC Recruitment 2022: मित्रो, सरकारी नोकरी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुवर्णसंधी, इच्छुक उमेदवार त्वरा करा
MPSC recruitment 2022
Image Credit source: Social Media
रचना भोंडवे

|

Jul 27, 2022 | 11:11 AM

MPSC Recruitment 2022: तुम्ही MBBS डॉक्टर आहात? चांगल्या पदावर सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहात का? असं असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) ही संधी तुमच्याचसाठी आहे. एमपीएससीने वैद्यकीय अधिकारी (एमओ) या पदावरील भरती काढली आहे. इच्छुक उमेदवार mpsconline.gov.in आयोगाच्या वेबसाइटवर (MPSC Official Website) जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या रिक्त पदांतर्गत वैद्यकीय अधिकारी, गट-ब या पदांच्या एकूण 427 जागा या संलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 आहे, तर तुम्ही 20 ऑगस्ट 2022 पर्यंत फी भरू शकता. या व्हेकन्सीमध्ये (Job Vacancy) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी (MBBS Degree) घेतलेले लोकंच अर्ज करू शकतात. अर्जदाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीच्या आधारे होईल, अर्जदारांची निवड केली जाईल आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. जर इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असेल तर शॉर्टलिस्टसाठी स्क्रीनिंग टेस्ट देखील असू शकते.

 1. एकूण 427 जागा
 2. शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022
 3. अर्जदाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे
 4. भरती प्रक्रिया- मुलाखत

अर्ज शुल्क किती असेल?

या रिक्त जागेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज करण्याचे शुल्क 394 रुपये ठेवण्यात आले आहे, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 294 रुपये भरावे लागणार आहेत. भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी, आपण आयोगाच्या वेबसाइटवर रिक्त जागा संबंधित अधिसूचना तपासू शकता.

असा करा अर्ज

 • या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
 • सर्वप्रथम आयोगाची अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in उघडा.
 • यानंतर होम पेजवर दिसणाऱ्या ‘युजर रजिस्ट्रेशन’ या पर्यायावर क्लिक करा.
 • यानंतर जे पेज ओपन होईल त्यात तुम्हाला अनेक प्रकारचे डिटेल्स विचारले जातील. ते भरताच तुमची नोंदणी होईल.
 • यानंतर रिक्त जागेसाठी तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
 • ही माहिती दिल्यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्रं अपलोड करावी लागतील आणि त्यानंतर फी भरावी लागेल.
 • फॉर्म सबमिट केल्यानंतर पावती सेव्ह करून प्रिंट घ्यायला विसरू नका.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें